आज ऊन्ह जरा जास्तच आहेत ना..दूर त्या नभात असलेला सूर्यनारायण आग ओकतोय.माझ्या सम्पूर्ण शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत..इतका घाम गेलाय की शर्ट पाठीला घट्ट चिकटून बसलाय..अशा या परिस्थितीत मी ध्येयाकडे मार्गक्रमण करतोय..केव्हापासून तरी तहान लागलीये मला, आसपास एखादी विहीर असली तर बरंय..कालपासून चालून चालून अंग अंबलय..शिणवटा आलाय तरीही मी चालतोय, चालतच राहतोय..आकुबाजूची झाडे ही पूर्ण वाळून गेली आहेत.ईथे ना पानांची सळसळ ऐकू येतेय ना पक्ष्यांचा किलबिलाट..
ह्या सगळ्या वातावरणात वरखाली होणाऱ्या माझ्या श्वासांचा आवाज मला ऐकु येतोय नि वाटेवर पडणाऱ्या माझ्या संथ पावलांचा.. एवढीच काय ती जाणीव.. माझं असणचं मुळी त्या परिसराला नवं आहे..सोबतीला निरव शांतता घेऊन मी वाटचाल करतोय. झाडांच्या पानांची सळसळ सुद्धा होत नाहीये.सगळंच शांत...
ही शांतता मला नकोय कारण ही सुखसमृद्धीने नांदत असलेली शांतता नाहीये..काहीतरी गूढ पोटात घेऊन वावरणारी शांतता आहे.मी किती तास चाललो हे आठवत नाही मात्र आता सूर्य चांगला त्या डोंगरपलीकडे गेला आहे,थोड्याच वेळाने रात्र होईल,पण हे आभाळात ढग कसले जमू लागलेत..एक ढग आला त्यामगोमाग दुसरा आता तर पूर्ण आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेलय.मावळतीला आभाळात जमणारा केशरी रंग कुठच्या कुठं विरून गेलाय,त्याला दूर लोटून हे काळं आभाळ आलंय.माझ्या पुढ्यात उभं ठाकलयं, तो येईल का ?माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकून गेली. नक्कीच तो येईल.आजपर्यंत मी त्याला खूप ठिकाणी शोधलंय पण प्रत्येक वेळी तो माझ्याहातावर तुरी देऊन निसटलाय.मला खूप वेळा हुलकावणी दिली आजे त्यानं.मात्र यावेळी मला त्याला गमवायची अजिबात इच्छा नाही आहे.जर त्याला गमावलं तर एका मोठ्या आनंदाला मी मुकणार आहे.त्यानं आजवर माझी मोठी फरफट केली आहे.त्याच्या न्यायाने आज इथं तो येईल..मी त्याला कवेत घेऊन स्वर्गप्राप्तीचा आनंद घेईन.मला विश्वास आहे तो येईल,उन्हाने तडपून पोटात खड्डे पडलेल्या धरणी मायेची कूस भरायला..मला माहिती आहे तो येईल माझ्यातली आणि तिच्यातली दरी कमी करायला.. मला माहिती आहे तो येईल तिच्या आनंदासाठी थेंबांची आरास ओतायला.. मला माहिती आहे तो येईल माझं विदीर्ण काळीज तृप्त करायला.. मला माहिती आहे तो येईल,माझ्या दुःखावर टीपं गाळायला.मला माहिती आहे तो येईल, मातीच्या त्या मंद सुवासानं मला प्रफुल्लीत करायला..आणि हे काय तो आला..वर्षांनुवर्षे वाट ज्याची मी वाट पाहिली तो आला..त्याच्या त्या कोसळण्यात मी मनसोक्त भिजून घेतलं.. इतकं भिजून घेतलं की त्या सरी मला भेटून खूप रडल्या मग मी ही रडलो.त्या वर्षावात माझ्या डोळ्यातलं पाणी त्याच्यातचं विरून गेलं..इतकं की खूप वर्ष कोरडं असलेलं माझं मन हे त्याच्या येण्याने पुन्हा ओलं झालं होतं.तो जसा आला तसाच गेला ही,तहानलेल्या मातीने त्याला शतश: धन्यवाद दिले. आता ना रात्र ना दिवस अशी स्थिती येईल व अंधाराचे घट फुटू लागतील रात्रीचं साम्राज्य सुरू होईल आणि उद्या सूर्यनारायण उगवेल तो नव्या झळाळीसाठी....
@Baba chirkutnath