Saturday, 30 September 2017

दसरा आणि श्रीखंड

दसरा स्पेशल  पोस्ट
.......................
आला दसरा............
दसरा आणी श्रीखंड
दसरा आणी श्रीखंडा चे एक अतूट नाते आहे..
लहान पणी चक्का तयार करणे म्हणजे साधारण ३-४ आधी दिवस तयारी असायची.
साय साठवणे ..व सा~याना पुरेल इतक्या श्रीखंडा इतके दही झाले कि मग ते एका फडक्यात बांघून ते भिंतीला टेकेल अश्या रितेने खुंटीला टांगले जायचे..ज्या मूळे त्यातले पाणी भिंत शोषून घेई व घट्ट चक्का बनत असे.
पूर्वी भिंती भेनड्याच्या म्हणजे मातीच्या विटाच्या असायच्या..
सकाळीच चक्का व प्रमाणात साखर .. दुध घालून घोटणे सुरु व्ह्यायचे..
मग सहाणीवर दुधात जायफळ उगाळणे. ..व ते मिश्रंण चक्यात मिसळले जायचे..
केशर वा रंग घालून शेवटचा हात फिरवला कि झाले श्रीखंड तयार..
काळ पुढे सरकत गेला अन तयार चक्का मिळू लागला व घरी चक्का बनवणे जवळ जवळ कालबाह्य झाले.
चक्कात हि साधा व मलाई चा असे २ प्रकार असायचेच..
केंव्हा ते आठवत नाही पण एका चतुर बल्लावाचार्याने हापूस च्या आंब्याचा रस चक्कात मिसळून आम्रखंड हा प्रकार शोधला.
अन हा प्रकार खूप लोकप्रिय झाला..खर तर त्याचे श्रेय देसाई व चितळे याना असावे का???.
काना मागून आला अन ह्या म्हणी प्रमाणे आम्रखंड हा प्रकार श्रीखंडा पेक्षा ज्यादा पॉप्युलर आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही..
हल्ली तर १२ हि महिने श्रीखंडा /आम्रखंड तयार स्वरूपात मिळते.
मला श्रीखंड हा प्रकार आवडतो...तो हि घरी केलेला ..पण बहुमत आम्रखंड च्या बाजूने असते.
दसरा आला कि मन भूतकाळात जाते अन सारे आठवते..
अन आज हयात नसलेले बाबा पण


©गौरीश देशपांडे

Friday, 29 September 2017

मुंबई रेल्वे दुर्घटनेतील माझ्या बांधवांसाठी

खर मी असतो तरी कोण या जगाच्या दृष्टीने , एक साधा सरळ कुणाच्याही बेरजेत न येणारा असतो. आतून प्रचंड उलथापालथी सहन करत असतो, मला ना सरकारची पडलेली असते ना कुठल्या मागणीची . रोज लोकलच्या भयाण गर्दीतून त्याच ओळखीच्या पण अनोळखी वाटेवरुन जात असतो. घरी परतेन की नाही माहित नसतं. राजकारणी गरजेपुरतं वापरून सोडतात, मी आता ट्रेन मध्ये चढायला सुद्धा घाबरतो, रोज ऑफिसला जाताना बायकोला वाटतं की ऑफिसला नाही युद्धावर चाललाय , या विशाल भाऊगर्दीत माझ्यासारखे अनेक जण सापडतील तुम्हाला.  बॉम्बस्फोट , चेंगराचेंगरी , ईत्यादी ठिकाणी मीच मरतो पण जग पुढे चालत राहत
कुणाला काही फरक पडत नाही . खर माणुसकी हरवलिये कुठेतरी. आपण आता हातात हात घालून एकत्रित पुढं गेल पाहिजे. अश्यावेळी एक भावना मनात येते,  
"कोणीतरी यावं,काहीतरी  बोलावं,काहीतरी विचारावं
असं  खुपदा वाटतं…
 मन काठोकाठ भरलेलं असतं,ते कुठेतरी रितं करावसं वाटत असतं ,पण त्यासाठी आपलं असं कोणीतरी हवं असतं….
आणि बहुतेकवेळा,कोणी असलं तरी असून नसल्यासारखच असतं …
अशावेळी,कोणीतरी यावं , काहीतरी बोलावं,काहीतरी विचारावं असं वाटत राहतं…
आजूबाजूला गर्दी असते , त्यात मी एकटाच चालत असतो  
ओळखीची असूनही अनोळखी वाटणारी वाट एकटाच तुडवत असतो…
 चालताना कल्पना नसते की पुढे अनेक अडथळे माझी आतुरतेने वाट बघत आहेत…
चालता चालता डगमगतो , तसाच चालत रहातो अडखळतो , पडतो , पुन्हा उठून चालू लागतो
अपयशाचे डोंगर चढताना , यशाचं  शिखर केव्हा येईल हाच
विचार करत असतो…
ते शिखर मला केव्हातरी गवसेल ही आशा मनात असते…
 परंतु त्याहीवेळी, कोणीतरी  यावं , काहीतरी  बोलावं , काहीतरी विचारावं असं
पुन्हा पुन्हा वाटत रहातं, पुन्हा पुन्हा वाटत रहातं…….

आपलाच गौरीश देशपांडे
(कालच्या मुंबई रेल्वे स्थानक दुर्घटनेतील माझ्या बांधवाना समर्पित)

प्रेमकविता नंबर 2

मंद सुवासी तुझी ही कांती,
मोहविते ती मज एकांती .

सुंदर , मुलायम, हस्त त्ये कोमल,
हलकेच खट्याळ मनपरि चंचल .

कोवळी ति नाजुक मान ,
गाल मऊ आणि गोरेपान .

सर्वांगसुन्दर तुझी ही काया ,
गुंफते त्यात मज वेडी माया .

आजचे रूप तुझे नवे होते ,
शब्द कविरूपी मज हवे होते .........

©गौरीश देशपांडे
आजचा जांभळी रंग
उस्मान शेठ , आणि समस्त जीभा जांभल्या केलेल्या मंडळी
यांना समर्पित
फीलिंग - उस्मान शेठ

ग्रेट. पुल देशपांडे 

Thursday, 28 September 2017

पांडेगिरी

सुखानं प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतोच असं नाही पण
आनंदाने केलेली प्रत्येक गोष्ट सुख  देऊन जाते .......

  -#पांडेगिरी

प्रेमकविता

प्रथम प्रेमकविता
डोळे
डोळे तुझे टपोरे
जणू मोत्यांसारखे भासणारे ,
नाजूक कोमल फुलाप्रमाणे
खुदकन कधी हसणारे.....
डोळे तुझे मधासारखे
खूपच गोड असणारे
रोखुन आत पहाता
ध्येयाची ओढ जपणारे ....
कधी रागात वटारून पाहणारे
कधी न बोलताच सर्व सांगणारे
डोळे तुझे
माझ्या मनी वसणारे .......
© गौरीश देशपांडे

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...