एक रात्र रायगडावर
दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगड म्हणजे महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या अस्मितेचा,जिव्हाळ्याचा गड.
शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडी जाण्याचे भाग्य मला लाभले.30 तारखेस सकाळी आम्ही निघालो
साताऱ्यातुन आम्ही 8 जण होतो.आमच्या बरोबर इतिहास अभ्यासक वैद्य काका होते, त्यांची ही रायगडावर यायची 65वी वेळ होती.मेढा मार्गे महाबळेश्वरला गेलो, तेथूनच पार या गावी गेलो ह्या पार गावातील वरदायिनी देवीचे मंदिर पाहिलं, ही देवी ही जावळीच्या मोऱ्यांची देवी.मंदिराचं आवार प्रशस्त होतं. मग खाली उतरुन शिवाजी महाराजांनी बांधलेला कोयना नदीवरील पूल पाहिला.300 वर्षे जुना हा पूल आजही मोठ्या दिमाखात उभा आहे.तिथुन पुढं तुकाराम महाराज यांचं मूळ गाव पाहिलं मग पुढे निघालो.प्रतापगड रोडवरून दिसला,त्या घाटाने खाली पोलादपूरला आलो
मग कवींद्र परमानंद नेवासकर यांची समाधी पहिली.
एक एक पाऊल आम्ही रायगडाच्या जवळ येत होतो. मध्ये महाडचा नवा पूल लागला, (2016 ची दुर्घटना)
वाटेत रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर चिंतामणराव देशमुख यांचे नाते हे गाव लागले.मग कोंजर मधून पुढे होऊन पाचाडला आलो.देशमुख यांच्या हॉटेल मध्ये थोडा नाश्ता केला. तिथूनच रायगडाचं देखणं रूप पाहिलं, "अरे हे टकमक तो हिरकणीचा कडा. "मग सौरभ दादांनी वाघबिळ दाखवलं व पायथ्याशी पोहोचलो. वैद्य काका व इतर ज्येष्ठ मंडळी रोप वे ने नी गेली व आम्ही तरुण
मी,सौरभदादा, लाहिरी सर, ह्रिशीकेश असे चालत निघालो. दरवेळी काय पायऱ्या वरून जायचं म्हणून नाना दरवाजाने जायचे ठरवलं.यामुळं थोड्या पायऱ्या वाचल्या व दरवाजा बघता आला. ( लहानचा अपभ्रंश नाना)
पुढे खरी कसोटी लागली . पायऱ्या सुरू झाल्या, आधीच उन्हाळा, त्यात रायगड शर्ट घामाने पूर्ण भिजला. ताक सरबत घेत घेत निवांत फोटो वगैरे घेत संध्याकाळी पावणे सातला गडावर पाहोचलो.
खालून जेव्हा रायगड पाहिला , तेव्हा त्याच ते विशाल रूप मनात साठवलं आणि बखरीतील वाक्य पुरेपूर पटली.
महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,
राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. ”
देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि. हे बघून महाराज खुशीने म्हणाले… तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचं महाराजांनी निश्चित केलं.
हे रायगडच रूप पाहून आनंद झाला.गेल्या गेल्या सदरेवर गेलो.महाराजांना नमस्कार केला. बॅग वगैरे ठेवल्या,हात पाय धुतले आणि बसलो. राजदरबारात पूर्ण मंडप होता.
शिवाजी रायगड स्मारक मंडळाने सर्व सोय व्यवस्थित केली होती.रात्री जेवण केलं आणि पुन्हा सदरेवर येऊन कार्यक्रम पाहत बसलो.ती रात्र खर तर मी आयुष्यभर विसरणार नाही. जेधे कुटुंबियांची मुलाखत, मेजर ओक, तसेच सर्व पुरस्कार प्राप्त लोकांची मुलाखत पाहिली.
गायकांनी शिवाजी महाराजांवरील स्फूर्तीदायक गाणी म्हणली.हे सर्व पाहून अंगावर रोमांच उभे राहिले.
शाहिरी पोवाडे झाले. आपण इकडे आलो नसतो तर एका मोठ्या आनंदाला मुकलो असतो याची पदोपदी प्रचिती येत होती. रात्री एक पर्यंत कार्यक्रम चालले होते.
झोप सुद्धा छान लागली . सकाळी चारलाच उठलो.
सर्व आटोपुन सूर्योदयाची वाट पाहत बसलो. चंद्र काय दिसत होता. सूर्य उगवला राजगडापासून, मध्ये तोरणा , नंतर शिवसमधी,जगदीश्वर मंदिर, आणि मी
सूर्योदयाचा अपूर्व सोहळा पहावयास मिळाला. सूर्य आणि चंद्र एकाच वेळी आकाशात पाहिले.
नाश्त्या साठी एक टन पोहे आणले होते. नाश्ता केला,
साहसी खेळ पाहिले.मग टकमक टोकाकडे गेलो
लिंगाणा दिसला. मग कार्यकमस्थळी पोहोचलो
प्रमुखपाहुणे म्हणून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत होते. त्यांनी सुंदर भाषण केले. भाषणात ते म्हणाले रायगडावर येण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य असावे लागते.
रायगड पाहून खरंच मला पटलं ते...
भाषणे , पुरस्कार सोहळा पार पडला.
पालखी निघाली पालखी मागून आम्ही निघालो. जगदीश्वर, समाधीचे दर्शन घेतले, घाणेकर सर भेटले.
सौरभ दादांनी त्यांचं पुस्तक समाधीला लावून आशीर्वाद घेतले, शिलालेखाचे अर्थ सांगितला.पुढे फूड पॅक घेऊन आम्ही सदर व मागचे वाडे पाहिले.ती भव्य सदर पाहून मनी विचार आलेले की कधी काळी महाराज सुद्धा या वाटेवरून चालले असतील, महाराजांची किती रूपं या रायगडाने पहिली असतील.या गडपुरुषाने अनेक सुखाचे सोहळे, अनुभवले असतील, त्या नागरखान्यावर कितीतरी नौबती झडल्या असतील, या विचारांनी मी अंतर्मुख झालो. रायगडला वंदन केले आणि पालखी दरवाजातून खाली उतरून गड उतरायला लागलो.
गड उतरून झाल्यावर रामदास सहवासाने पावन झालेली, दासबोधाची जन्मभूमी शिवथरघळ पाहिली.
समर्थ म्हणतात:
'गिरीकंदरी सुंदर वन। सुंदर वाहती जीवन। त्यामध्ये सुंदर भवन। रघुनाथाचे।'
या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे नितांत सुंदर असा शिवथर घळीचा परिसर आहे. रायगड जिल्ह्यात लांबवर पसरलेल्या सह्यादीच्या पर्वतरांगामधल्या छोट्याशा डोंगरावर वाघजईच्या कुशीत हे ठिकाण आहे.
शिवथरघळीत जाणं नशिबात होतं.
गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे |
धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे || १||
गर्जता मेघ तो सिंधू | ध्वनी कल्होळ उठिला |
कड्याशी आदळे धारा | वाट आवर्त होतसे ||२||
तुषार उठती रेणू | दुसरे रज मातले |
वाट मिश्रीत ते रेणू | सीत मिश्रीत धुकटे ||३||
दराच तुटला मोठा | झाड खंडे परोपरी |
निबीड दाटती छाया | त्या मधे वोघ वाहती ||४||
गर्जती श्वापदे पक्षी | नाना स्वरे भयंकरे |
गडद होतसे रात्री | ध्वनी कल्लोळ उठती ||५||
कर्दमु निवडेना तो | मानसी साकडे पडे |
विशाळ लोटती धारा | ती खाले रम्य विवरे ||६||
विश्रांती वाटते येथे | जावया पुण्य पाहिजे |
कथा निरुपणे चर्चा | सार्थके काळ जातसे ||७||
समर्थांनी म्हणल्याप्रमाणे शिवथरघळीत एका प्रकारच्या विलक्षण शांतिची अनुभूती होते.
31 तारखेस रात्री घरी आलो, 1575 पाय-या चढ उतार केल्याने पाय दुखतायत. दुखतील एखादा दिवस. पण दोन दिवसात मिळालेली उर्जा वर्षभर टिकेल यात शंका नाही.
आयुष्याच्या वाटेवर मागे वळून पाहताना पायांच्या दुखण्यापेक्षा "होय मी शिवपुण्यतिथीला रायगड पाहून आलोय" ही भावना खूप मोठी आणि अभिमानाची आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
@गौरीश देशपांडे
(सोबत फोटो जोडत आहे)