Monday, 20 April 2020

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, almost fifteen years ago.

It rained that day in Godric's Hallow. She remembers the executioner's axe slicing off the boy's head, and it rolling, rolling through the mud and rain. Ron, I wish you were here. she thought. They'd made love before he ran. She heard he'd been training in Albania. Waiting to return, running with a company of mercenaries.

Hagrid fled too, deep into the forbidden forest. Some students say he went feral, blinded by Harry's death. Unable to live in Lord Voldemort's world.

When her wine was gone, she called the mead trolly and paid the girl for a second flagon. "Wine, wine, wine... greatest magic in the world," she mumbled to herself, "I hope the gods make it rain wine. I should invent a spell for that." She laughed. Perhaps her students would appreciate it - many had been drinking too much since their friends died in the battle. But the thought of the sky raining wine reminded her too much of Professor Trelawny's last words, her last prophecy: "*When the sky turns red as blood... when the sword consumes the last lion... only then will the chosen one return... only with the blood of the many will the dark one fall.."

After Sybill Trewlaney spoke her last words Hermione Grainger had cast the killing curse and ended her life, somewhere deep in the Ministry of Magic. The charlatan. I'm glad I killed that serpent. She was a fool that peddled to the dark lord. Professor Trelawny only ever wanted a safe place to live, and she was willing to side with whatever forces she thought could protect her. They couldn't. Not after she told Headmaster Umbridge what Minerva was planning. She betrayed the Order of the Phoenix, and now Hermione alone remained of their number. But she'd avenged most of their deaths: only Snape, their greatest betrayer, remained.

Still, the false prophet's words stuck with her: "When the sky turns red as blood... when the sword consumes the last lion... only then will the chosen one return... only with the blood of the many will the dark one fall.."

The chosen one was dead. Harry Potter was dead. The last lion... could be anyone. But the image of blood dripping from the sky stayed with her in her dreams, all the way to Hogsmead.

When she arrived she unpacked her trunk in her office. It was near where the old Gryffindor tower used to be. Before the massacre. Snape kept Hermione alive only because she was useful. Bright, talented, ruthless when need be. She convinced Snape that she'd switched sides. So Hermione lay in wait for fifteen years. Until today.

The great hall was empty that night. But she knew that Snape would be pacing it's length, as he often did. He liked how the enchanted ceiling responded to his emotions. When he brooded, the sky turned grey and tumbling. That night, stormclouds boomed above him.

First she cast a muffling charm around the door; it reminded her of when she, Harry, and Ron used to use a similar charm to gossip. It almost made her smile. But it only hardened her resolve. Hermione swung open the doors and screamed: "Petrificus totalis!

The charm struck Snape in the chest. It was just enough to stall him. But she needed full control. She looked for the cruelest part of herself to cast the imperius curse: she used the memory of killing Trelawny. "Imperio" she whispered.

Snape went rigid. He hovered in the air. He was trying to say something through the power of her spell. What was it?

"Always..." he moaned, "Always..."

She didn't understand. "Always what? Always betrayed us? Always had McGonigal killed? Moody, killed? The Longbottoms slaughtered in their home?"

"No..." he said, "No..." he wasn't looking at Hermoine. He was looking behind her.

"Yes, Severus. Your time has come. This is for Har---"

She felt a stab in her back. The tip of the sword emerged from between her breasts. It looked slightly red, the metal. Or was that her blood?

"I'm sorry, love." said a voice from behind her, "But I can't let you interfere with our plans. Voldemort will fall... but we need the chosen one. And we need Snape."

Hermione slumped to the ground. Neville Longbottom pulled the sword of Gryffindor from her back. It make a sickening, wet sound.

"No..." Snape moaned, "No..."

Neville broke the Imperius curse with a wave of his wand, That shouldn't be possible, she thought.

Snape rushed to her side. She was lying on the ground now, looking up at the enchanted ceiling.

"No!" he yelled, "Grainger. Look at me. Neville you blistering fool, get me a healing kit."

"It's too late, Severus. The last lion has fallen." Longbottom said.

Hermione's eyes widened, but when she tried to speak she could not. Neville. The chosen one, all along. Her, the last lion. Could it be true? The prophecy?

She felt something wet and warm drop on her face. Then another. Another droplet.

She looked up at the enchanted ceiling. The clouds were as red as the inside of a remembral. And dropping from them, coming in torrents now, was blood. Sheets and sheets of blood filling the room, whipped up by wind that came from no where.

And with her last breath, she smiled.

Sunday, 29 March 2020

मग्लुब का मैखाना..

तो तू है शुमार हुस्न के मेयारों में,
यूँ तो तू है इक ही महजबीं हजारों में,
तेरे गेसू, तेरी पलकें, तेरी आँखों का रंग,
तेरी गर्दन, तेरे झुमके, तेरे हंसने का ढंग,
तू जो शरमाए तो मौसम का हुनर फ़ीका हो,
इससे पहले भी ये शायद किसीने लिख्खा हो,
ऐसा मजबूर हूँ के सब चुराए बैठा हूँ,
मैं तुझे इस कदर ख़ुदा बनाए बैठा हूँ...!


तेरी पाज़ेब की कड़ियों में जुबाँ अटकी है,
तू जरा चल के उसे बातें बहुत करनी है,
क्यों गला घोंट रही हो मेरे अल्फ़ाज़ों का?
और कब तक मैं सितम सह लूँ इन नाज़ों का?
अपनी एडी से कहो ऐसे न दिल को कुचले,
और उस दिल से कहो के मेरे दिल को रख ले,
के मेरी जाँन, मेरा दिल लगाए बैठा हूँ,
मैं तुझे इस कदर ख़ुदा बनाए बैठा हूँ...!


उसने डर डर के कहा सुन तेरे आशिक़ की सदा,
एक आशिक़ के लिए बात बड़ी होती ये,
तेरी सूरत, नजरअंदाज उसे कर भी लूँ,
माना कुदरत कि वो सौग़ात बड़ी होती है,
मैं तुझे प्यार करू बस मेरी ये ख्वाहिश है,
तू है नेमत, है अता, और तू नवाज़िश है,
मैं तेरे अक़्स को ख़ुद में समाए बैठा हूँ,
मैं तुझे इस कदर ख़ुदा बनाए बैठा हूँ...!

( Dedicated to most sincere and caring girl, Yuveeka Jahagirdar. You are my bundle of joy,  You have a amazing sense of humor, you are reason behind my urdu love.you are the precious one.. i know you are expecting an essay, but I am tired,  Now, you are officially engaged with prasad , but you are still my crush.. love you and happy birthday..) 

माणसांच्या देशा..

माणसांच्या देशा !

१.

सिग्नलला गाडी थांबली… एवढी गर्दीची वेळ असूनही आज साधं चिटपाखरूही नव्हतं रस्त्यावर… तुरळक गाड्या दिसत होत्या… ट्रॅफिक पोलिसाने हटकून विचारलंच… एअरपोर्टवरून आलोय म्हटल्यावर तो मागे हटला आणि म्हणाला, हाफ लॉकडाऊन आहे , थेट घरीच जा आणि घरीच राहा साहेब.

त्याने मान डोलावली, म्हणाला, मी बेजबाबदार देशातला जबाबदार नागरिक आहे. कारण मी सतत परदेशांत जात-येत असतो. मला नीट माहिती आहे हा भयंकर आजार कसा पसरू शकतो ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे स्वतंत्र खोलीही आहे क्वारंटाइन करून घेण्यासाठी.

पुढच्या सिग्नलला त्याचं लक्ष रस्त्याकडेच्या झोपड्याकडे गेलं… मलूल प्रकाशात त्याहून मलूल चेहऱ्याने बसलेलं कुटुंब पाहून त्याला भडभडून आलं… एरवी त्याला ‘ही गलिच्छ माणसं शहरं विद्रूप करतात,’ असं वाटून किळस यायची… आज त्यांना पाहू  मात्र त्याच्या मनात कणव दाटून आली… इथून पुढच्या काही दिवसांत पूर्ण लाॅकडाऊन घोषित होईल आणि मग यांचं काय होईल? यांना भीक घालायलाही रस्त्यावर कोणी असणार नाही…

त्याने काच खाली केली, भिकाऱ्यांच्या कुटुंबप्रमुखाला खुणेने बोलावलं… हाताला लागलेली पाचशेची नोट त्याने सरळ त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवली… भिकाऱ्याचे डोळे पाण्याने डबडबले… आपल्या गाडीत आज किती दयाळू माणूस बसलेला आहे, या कल्पनेने उबरचालकही सद्गतित झाला…

…थोड्या वेळापूर्वीच परदेशातून आलेला माणूस बंद कारमध्ये खोकला होता… जबाबदार नागरिक असल्याने त्याने खोकताना तोंडावर हात धरला होता… मात्र, त्याच हाताने त्याने भिकाऱ्याला पाचशे रुपये दिले होते, त्याच हाताने तो कॅबचालकालाही दीडशे रुपयांचं बिल झालेलं असताना दोनशे रुपयांची नोट देणार होता… 'कीप द चेंज' असं म्हणणार होता…

…आजवर पाचशेची नोट केवळ सिनेमातच पाहिलेल्या भिकाऱ्याला आणि कॅबचालकाला नेमकी काय भेट मिळाली आहे, हे १४ दिवसांनी कळणार होतं… कुठून मिळाली आहे, हे त्यांना कधीच कळणार नव्हतं… त्यांच्याकडून ती ज्यांना मिळणार होती, त्यांना तरी कुठे कळणार होतं?…
****

२.

हवालदार भोसलेंनी घर सोडल्याला ४८ तास उलटून गेले होते, अजून किती वेळाने घरी जायला मिळेल याची काही कल्पना नाही… श्रेयसचा दहावीचा सेकंडलास्ट पेपर , त्याला पेपर ला सोडायला परीक्षेच्या केंद्रावर गेले,त्याला वर्गात सोडलं आणि साहेबांचा फोन आला, वरून काहीतरी अर्जंट ऑर्डर आली होती म्हणे, पोलीस स्टेशनला जावं लागणार होतं. तडक घरी जाऊन बिना इस्त्रीचा युनिफॉर्म तसाच घालून हवालदार स्टेशनवर पोहोचले. घाईघाईने नेमक्या बीपीच्या गोळ्या घ्यायला विसरले,  १४४ कलम लागलंय एवढंच माहिती होतं… रस्त्यात बाहेर पडणाऱ्यांना ‘घरात राहा रे बाबांनो’ अशी हात जोडून विनंती करत होते ते. नंतर चक्रं फिरली आणि संचारबंदी जाहीर झाली तशी त्यांना काठी काढावी लागली… खुद्द गृहमंत्र्यांनीच काठीला तेल लावून ती वापरा, असं सांगितल्यावर त्यांचाही नाईलाज होता… पोलिसी नजर होती, खरोखरच कामाला कोण निघालाय, हे त्यांना अंदाजाने कळायचं, निव्वळ टाइमपासला निघालेली पोरंही समजायची आणि मग त्यांच्या दंडुक्याचे रट्टे त्या पोरांच्या ढुंगणावर पडायचे…

फारतर दीडेक दिवसांनी घरी जाऊ अशा समजुतीने डयुटीवर आलेल्या भोसल्यांच्या लक्षात आलं की आता दोनतीन दिवस तरी सुटका नाही… त्यांना नीट चहा आणि वडापाव मिळत नव्हता, जेवण कुठून मिळणार… त्यात पब्लिक सार्वजनिक सुटी असल्यासारखी बाहेर पडत होती… जीवनावश्यक वस्तू सतत मिळत राहतील हे सांगून मुख्यमंत्री थकले तरी लोक आता कधीच काही मिळणार नसल्यासारखे धावत होते…

झोपेचा अभाव, जेवण्याखाण्याची आबाळ, कुटुंबापासून दूर राहिल्याची चिडचीड आणि थकवा यांनी त्रासलेल्या भोसल्यांना मोटरसायकलवरून घाईघाईने निघालेला माणूस दिसला आणि त्यांच्या कपाळाची शीर तडतडली… त्यांनी मोटरसायकलीला आडवे जात थांबण्याचा इशारा केला, मोटरसायकल कडेला भेलकांडली तेव्हा पुढे होऊन सटासट रट्टे ओढायला सुरुवात केली… तो माणूस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार होता, पण पोलिसी दंडुक्याचा एक रट्टा पडताच त्याची जीभ तोंडातच गोठून गेली… कसाबसा तो उलटा पळाला…

तेवढ्यात भोसल्यांच्या मागून एक कार आली… ड्रायव्हरच्या मागे नियमाप्रमाणे एक पॅसेंजर बसला होता… रूबाबदार, नीटनेटका… कारवर मेडिकल क्राॅसची खूण होती… भोसल्यांनी खूण करताच काच खाली करून ड्रायव्हर म्हणाला, डाॅक्टरसाहेब अर्जंट आॅपरेशनसाठी निघाले आहेत…

…या भयंकर महामारीच्या काळात निम्याहून अधिक डाॅक्टरांनी दवाखाने बंद केलेले असताना काही डाॅक्टर देवदूतासारखे धावून जातात, हे कळल्याने भोसले सद्गतित झाले… त्यांनी हात वर करून अभिवादन केलं…

…मोटरसायकल सोडून पळालेला डाॅक्टर मनोमन स्वत:ला शिव्यांची लाखोली वाहात होता… आरोग्यमंत्र्यांचं आवाहन मनावर घेऊन क्लिनिक उघडायला जाण्याची दुर्बुद्धी आपल्याला कशी झाली, असं त्याला वाटत होतं… दुसरीकडे भरधाव सुटलेल्या कारमधल्या ‘डाॅक्टर’ने सुटकेचा नि:श्वास सोडला… त्याच्या डिकीत सिगरेट, दारू, मावे, गुटखे,ड्रग्ज, अशी परिचितांमध्ये गुपचूप दामदुप्पट भावाने विकण्यासाठीची जीवनावश्यक ‘औषधं’ होती… हवालदाराने तपासलं असतं, तर काही खरं नव्हतं… ड्रायव्हर बनलेल्या मित्राला काचेवर चिकटपट्ट्या लावून डाॅक्टरच्या गाडीचा भास निर्माण करण्याची भारी आयडिया सुचली, याचं त्याला फार कौतुक वाटलं…
****

३.

मनोज युनिटमध्ये हताश होऊन बसला होता,खरं तर शिफ्ट संपवून कामगार घरीही गेले होते, हा मात्र अजूनही तिथेच होता, त्याच्या डोळ्यात अश्रू आणि चिंता दाटून आली होती, चांगल्या मार्क्स मिळवून साताऱ्यातल्या एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयातुन तो मेकॅनिकल इंजिनियर झाला, मोठ्या पगाराची नोकरी चालून आलेली असताना सुद्धा त्याने स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. पण गेले काही दिवस त्याचं बरं चाललं नव्हतं, आर्थिक मंदी आल्यापासून तर त्याचं कंबरडंच मोडलं, मगाशीच MSEB मधून त्याला फोन येऊन गेलेला, कंपनीचं 2 महिन्यांचं लाईटबिल थकलं होतं,अधिकारी तावातावात बोलत होता,वीज कापण्याची भाषा करत होता. त्याने कशीबशी अधिकाऱ्याची विनवणी करून पुढच्या महिन्याची मुदत मागून घेतली. हे जर असंच चालत राहिलं तर  कामगारांचे पगार सुद्धा आपण भागवू शकणार नाही या कल्पनेनंच त्याला रडू कोसळलं.. तेवढ्यात त्याचा फोन खणाणला,पलीकडून प्रज्वल बोलला, कलेक्टर साहेबांनी अर्जंट बोलवलं आहे ,असशील तसा तडक कलेक्टर ऑफिसला ये, मोठी ऑर्डर आहे. मनोज MIDC मधून लगेच गाडी काढून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला, जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल सांगितलं आणि ताबडतोब 1 लाख मास्क बनवण्याचं काँट्रॅक्ट त्यांना दिलं..
अवघ्या काही क्षणांपूर्वी दुःखी असलेला मनोज आता आनंदी होऊन नव्या उमेदीने जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत होता, त्याच्या निस्वार्थी प्रयत्नांना आज यश येत होतं, कॉलेज वयात त्याने पाहिलेल्या स्वप्नाला आज पालवी फुटत होती, एक नवी पहाट, नव्या आकांक्षा घेऊन नव्या आव्हानांच्या दुनियेत भरारी घ्यायला सज्ज झाला होती..
***

४.

सिस्टर संगीता थकली होती… तशी तिला थकव्याची सवय होती…

…तिचं कामच तसं होतं… प्रत्येक शिफ्टला तिला अख्ख्या वाॅर्डभर फिरायला लागायचं… पेशंट्सना वेळेवर औषधं देणं, त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करणं हे तिचं पगाराचं काम होतं… पण, हिंमत हरत चाललेल्या, बंदिस्त राहून वैतागलेल्या पेशंटांना धीर देणं हे कामही ती आनंदाने करायची… ती दिसली की लोकांना बरं वाटू लागायचं… आता आपण बरे होणार, असा विश्वास वाटू लागायचा… हे करताना ती किती थकून जायची, हे कधीच कुणाला कळायचं नाही…

…पण यावेळचा थकवा वेगळा होता… कोरोनाच्या वाॅर्डमध्ये तिची नियुक्ती होती… नुसता मेडिकल मास्क लावून किंवा पूर्ण अंग झाकतील कपडे घालून आणि सतत निर्जंतुकीकरण करून, हात धुवून या रोगापासून वाचता येणार नाही, हे तिला पुरतं ठाऊक होतं, तिच्याबरोबर काम करणाऱ्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही हे माहिती होतं… पण, हे काम कुणी ना कुणी करणं आवश्यक होतंच… आपण होता होईल तो काळजी घ्यायची… हा रोग आपल्या कोट्यवधींच्या देशात पसरू द्यायचा नाही, यासाठी लढायचं, हे तिने ठरवलं होतं…

…जनता कर्फ्यूच्या संध्याकाळी सगळीकडे लोकांनी टाळ्या-थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा तर तिला एकदम भरूनच आलं होतं… एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आपल्याविषयी, आपल्या पेशाविषयी इतकी जिव्हाळ्याची, आदराची भावना आहे, तिच्यातून उतराई होण्याचा होता होईल तेवढा प्रयत्न आपण करायचा, हे ठरवून ती दुप्पट जोमाने कामाला लागली होती… तेवढीच ती थकली ही होती…

…हाॅस्पिटलच्या घरी पोहोचवणाऱ्या गाडीत तिचा कधी डोळा लागला, ते तिला कळलंही नाही…

…तिच्या चिगट चारमजली इमारतींच्या सोसायटीसमोर गाडी पोहोचली आणि तिला गोंगाटाने जाग आली…

तिने जे पाहिलं, त्यावर तिचा विश्वास बसेना… तिचं सगळं कुटुंब रस्त्यावर काढण्यात आलं होतं… टाळ्या-थाळ्या वाजवणारे, अडीअडचणीला हक्काने तिला बोलावून नेणारे, डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या नेणारे शेजारी अंतर राखून गोळा झाले होते आणि म्हणत होते, ‘तुमची मुलगी कोरोना वाॅर्डमध्ये काम करते… तिच्यापासून तुम्हाला आणि तुमच्यापासून आम्हाला संसर्ग झाला तर जबाबदार कोण?’


Main Concept : Mukesh M
Additional Writing : Gourish D 

Tuesday, 20 August 2019

This jacket was gifted to me by smita aunt on may 5, 2011, At that time she just brought it from USA. Today, 8 years and 105 days later, I am retiring it. I know it’s just an ordinary jacket- just like all my other clothes. But I have, what some people may call, an unhealthy relationship with my clothes. For instance, I still haven’t forgiven my mother for throwing away my childhood quilt which had letters of the alphabet and clowns leaning off of each letter.
But this jacket had gotten used to important days and, in what can only be described as freak coincidence or utter superstition, the jacket, whenever worn, made important things happen. I remember wearing it when I did my 1st trek, when I told my only-ever roommate that I will be moving out to live on my own, when I resigned from an internship I hated, and when I tried fire paan for the first time.

Today as I wore it for the last time, I hoped for one last extraordinary day. No new job or
love at first sight or anything, but a more than normal day to bid this jacket the farewell it deserves.

This old faithful delivered one last time. There were four roses in full bloom in my balcony garden, I met a new dog who is definitely friends with me now and met a man who talks to elephants - more on that later.

This jacket has more than merely covered my back, I strongly feel it has my back. Over these years, if I have tried to achieve something, it is to find the extraordinary in what seems mundane. Be it a fleeting moment of playfulness with a puppy or a garden rose in full bloom or this jacket. Things are only special when you make them special.

In my thinking mind, I know I am giving this piece of cloth too much importance. I know for a fact that this is, like every other jacket I have, an ordinary jacket. But in that same mind, there is a voice that knows - this jacket was gifted.

Gourish
20/8/2019..

Tuesday, 2 July 2019

अखेरचा दिवस

 जेव्हा त्याने ती रूम घेतली त्यावेळी अनेकांनी त्याला वेड्यात काढलं होतं. पगार 15 हजार आणि रूम भाडं 4 हजार, 'अरे मग तू सेव्हिंग कधी करणार ' असं एका लांबच्या काकानं कळकळीने विचारल्यावर तो विचारात पडला खरा. पण जेव्हा त्याने रूमवर स्वतःच्या हाताने आईने घेऊन दिलेल्या शेगडीवर पहिल्यांदा स्वतःच्या हाताचा चहा करून घेतला तेव्हा त्या चहा पिण्यात तो सगळ्या चिंता हरवून गेला. त्यानं खूप विचार करून रूममेट्स बरोबर राहण्याऐवजी स्वतः एकटं रहाणं पसंत केलं होतं.कारण ही तसंच होतं. लहानपणापासून तो पुस्तकांच्या सहवासात वाढला होता त्यामुळं त्याने फारसे असे मित्र जोडले नव्हतेच. म्हणूनच आई, तो आणि त्याची पुस्तकं एवढंच त्याचं विश्व होतं म्हणूनच एकटं राहून त्याला त्याची स्वतःची स्पेस जपायची होती.

बरोबर 2 वर्षं 4 महिने आणि 16 दिवस तो त्या रूम वर राहिला. रुम म्हणजे ते एक 3 खोल्यांचं आऊटहाऊस होतं.साताऱ्याच्या हार्टमध्ये असलेल्या सदरबाजारातल्या एका टोकाला शेवटच्या बंगल्यातले ते आऊटहाऊस फार भारी होतं.
एका टोकाला असल्यामुळे तिथं कोणीही रहायला यायला तयार होत नसे. त्या लोकांना तो हसायचा.ह्या आऊटहाऊसने त्याला जे दिलं ते त्याला आजपर्यंत मिळालं नव्हतं. घरी कुणी नसताना मिळायची तशी निरव शांतता त्याला तिथे मिळायची. आजूबाजूला बरेचसे बंगलेच असल्यामुळे गोंधळ,गोंगाट ह्याच्याशी त्याचा लांबलांबचा संबध नव्हता.
शिवाय मालकिणीची पण काही कटकट नव्हती.दर महिन्याच्या 5 तारखेला भाडं देण्याव्यतिरिक्त त्यांचा जास्त काही संबंध आलाच नाही.एरव्ही वैताग वाटणारा साताऱ्यातला पाऊस ह्या आऊटहाऊस मध्ये केवढाया सुखकारक वाटायचा. त्या अशोकाच्या झाडावरून पाणी सरळ वाहून लॉन मध्ये यायचं.तेव्हा त्या आभाळी वातावरणात बिअरचे घोट घेत वपुंची पुस्तकं वाचायला त्याला जाम भारी वाटायचं.शेजारीच बाल्कनीत आपल्या वेड्या पोराला गोष्ट वाचुन दाखवत असलेला बाप त्याला दिसायचा.त्याने वेड्या पोराच्या हौसेखातर गॅलरीत तसंच राहू दिलेलं सुगरणीचं घरटं कसलं भारी होतं.कित्येकदा त्या पावसात त्याला हा हातातला ग्लास उंचावून दाखवायचा. तो नुसतं हात वर करून हसायचा.त्या बापाच्या दृष्टीने हा पाऊस सुंदर नव्हताच.

आज तो तिथून निघत होता.
समोरच्या BMW वाल्या अतिश्रीमंत माणसाविषयी असलेला त्याचा राग कुठल्या कुठे पळाला होता.खरंच शेवटचा दिवस माणसाला काय काय पहायला लावतो.त्याची ती ब्लॅक कलरच्या क्वाड्रॅनगल वेस्पावरून बॅडमिंटन खेळायला जाणारी त्याची मुलगी त्याला रोज दिसायची.आज ती हसून गेली..
शेजारील बंगल्यातला बाप आपल्या वेड्या पोराला फिरवून घरी नेत होता. काय काय मिस करू आपण इथलं ? ह्या विचाराने त्याच्या मनात काहूर माजलं होतं. त्याच अवस्थेत तो नेहमीच्या उडपी हॉटेलात नाश्ता करायला गेला. चहा पिऊन झाल्यावर त्याचा हात नेहमीप्रमाणे पाकिटात जाताच 'आज राहुद्या' असं  नेहमी पोरांच्या अंगावर खेकसणारा उडपी हॉटेल मालक प्रेमानं म्हणाला.

सामानाची बांधाबांध जवळजवळ सर्व करून झाली होती.बाटल्या मात्र त्याने मागच्या रूमवर ठेवल्या होत्या म्हणून ती प्रथा जपायला तो त्या इथेही तो ठेवूनच जात होता. भाड्याचे थोडे पैसे आणि डिपॉझिट घ्यायला तो मालकीणबाईंकडे गेला.मालकीण बाई हसू चेहऱ्यावर ठेऊन म्हणाल्या ' वेळ मिळाला तर येऊन  जा पुन्हा कधीतरी भेटायला ' हा ही औपचारिकतेपुरतं 'हो' म्हणाला. त्यातला अर्थशून्य फोलपणा दोघांनाही कळाला होता.
सामान बाहेर काढून खोली लॉक करून तो रिक्षा बोलवायला गेला.रिक्षा आली तोवर पाऊस सुरू झाला होता..भिजत-गळत
त्याने सामान रिक्षात भरलं आणि रिक्षात बसला.
रिक्षावाल्याला म्हणाला 'काय वैताग आहे ना साताऱ्याचा पाऊस ! रिक्षावाला मागे वळला आणि मान डोलवुन  हो म्हणाला. तो गेला तसा तसा पाऊस वाढत गेला.. सकाळी वेड्या पोरानं गॅलरीत पाहिलं तेव्हा
पावसाच्या माऱ्याने त्या गॅलरीला लटकून असणारं ते सुगरणीचं घरटं गळून पडलं होतं..


Main theme   - Amol U .
Writing  - Gourish D.


Saturday, 13 April 2019

एक दिवस एक गाणं ..



आयुष्यातला काही काळ आपण गोष्टी मिळवण्यासाठी देत असतो. सुरुवातीला शिक्षण नंतर नोकरी/बिजनेस,मग लग्न वगैरे..म्हणजे स्वतःच्या आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा आपला प्रयत्न असतो. अशी शांत आणि छान लाईफ सर्वानाच हवीहवीशी असते,सगळीच माणसं विविध मार्गांनी अश्या आयुष्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मग शेवटी ते त्यात यशस्वी होतात.स्वतःच मोठ्ठ घर,हाताशी चांगला पैसा, प्रेमळ आईवडील,सुंदर अशी पत्नी, गोड मुलं असा प्रपंच व्यवस्थित सुरू असतो..सुखी आयुष्याची प्रत्येकाची कन्सेप्ट वेगवेगळी असली तर बहुतेक लोकांची ही अशीच असते..Life At Peace अशी संज्ञा त्याला आहे. मग अचानक आयुष्यात एक वादळ येतं आणि त्याने लाईफला एक वेगळंच वळण येतं. आपण असं अनेकांना म्हणताना ऐकलं असेल की ‘ती एक चूक मला फार महाग पडली’ किंवा ‘ते जर मी केलं नसतं तर आज हे असं झालं नसतं.’ मुळात ‘करू नये ते केले की होऊ नये ते होते.’ पण ह्या चुका सुधारायची संधी मात्र काहींना मिळते तर काहींना नाही..

मी बोलतोय ‘मासुम’ चित्रपटाबद्दल.मासुम हा गुलजार साहेबांचा लँडमार्क चित्रपट आणि शेखर कपूर ह्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा.मासुमंच आणि माझं एक वेगळंच नातं आहे.जेव्हा केव्हा मी ट्रान्समध्ये जातो तेव्हा मासुम पाहतोच पाहतो.अतिशय तरल विषयावर हा सिनेमा बेतलेला आहे.
नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमी हे एकमेकांचे नवरा बायको..गोड दोन मुली असा कुणाची दृष्ट न लागावी असा संसार..
सगळं मस्त चाललेलं असतं;पण एक दिवस नसिरुद्दीनला एक पत्र येतं आणि त्याचं सगळं आयुष्यच बदलून जातं. त्या पत्राद्वारे त्याला समजतं की पूर्वायुष्यातील काही चुकांमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर त्याची किंमत चुकवावी लागणार आहे..आणि मग पडद्यावर एन्ट्री होते ती जुगल हंसराजची..जुगल हंसराजने मोठं होऊन जरी काही छाप मारली नसली तरी ह्या सिनेमात तो अतिशय भाव खाऊन गेलाय.विशेष म्हणजे त्याचे ते पाणीदार आणि बोलके डोळे.हा जुगल म्हणजेच पिक्चरमधलं नाव ( राहुल)
हा नसिरुद्दीन शाहचा मुलगा असतो पण तो असतो सुप्रिया पाठककडून.पुढे सुप्रिया पाठक मरते मग राहुल नसिरुद्दीन शाह कडे राहायला येतो.मग शबाना आझमीचं त्याला सावत्र म्हणून हिणवणं. विंकी आणि मिनी ह्या दोन बहिणीबरोबर राहुलचं मिसळून जाणं पडद्यावर सुंदररित्या चितारलयं.

मासुमची गाणी हा तर स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.
‘लकडी की काठी’ हे गाणं तर प्रत्येक बालगोपाळाच्या तोंडावर अजून असतं.‘हुजूर इस कदर भी ना इतराके चलीये’ ही गझल म्हणजे सर्व पुरुषांनी पहावी अशी गझल आहे.’तुझसे नाराज नही जिंदगी’ ह्या गाण्याला लताबाईंनी त्यांच्या आवाजाने चार चांद लावले आहेत;पण मी बोलणार आहे ते ‘ दो नैना और एक कहानी’ ह्या आरती मुखर्जीच्या गाण्याबद्दल.

दो नैना और एक कहानी
दो नैना और एक कहानी
थोड़ा-सा बादल
थोड़ा-सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी
थोड़ा-सा बादल
थोड़ा-सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी
छोटी सी दो, झीलों में वो
बहती रहती है
छोटी सी दो, झीलों में वो
बहती रहती है
कोई सुने या ना सुने
कहती रहती है
कुछ लिख के और कुछ ज़ुबानी
थोड़ा सा बादल
थोड़ा-सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी
थोड़ी सी है जानी हुई
थोड़ी सी नयी
थोड़ी सी है जानी हुई
थोड़ी सी नयी
जहाँ रुके आँसू वहीं
पूरी हो गयी
है तो नयी फिर भी है पुरानी
थोड़ा सा बादल
थोड़ा-सा पानी
और…

हे गाणं म्हणजे शबाना आणि राहुल ह्या दोघांच्या भावविश्वाचं साधं सरळ चित्र आहे..आपला नवरा कुण्या दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो, एवढंच नव्हे तर तिच्यापासून त्याला एक मुलगाही (राहुल) आहे.हे शबानाला खटकत असतं. तिच्या आयुष्यात उगाच कुणी लुडबुड केलेली तिला चालणारी नसती.आपण आपल्या नवऱ्यावर प्रेम करायला कुठं कमी पडलो का ? की त्याला आपल्यात इंटरेस्टच नाही अशी भावना तिला डाचत राहते..हे ह्या गाण्यात चांगलं मांडलंय..सोबतीला राहुलचं निरागसपण, ही आई आपल्याला का सामावून घेत नाही आहे,त्यांच्या फॅमिलीत त्याचं स्वतःच अस्तित्व शोधायचा केविलवाणा प्रयत्न.ह्या गाण्यात तो प्रत्येक ठिकाणी त्याच्या आईला शबानाच्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय.त्याच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा आपले डोळेही ओले झाल्याशिवाय राहत नाहीत..
त्यामुळं मासुम हा सर्वार्थाने एक चित्रपट म्हणून चांगला आहे.RD बर्मनचं संगीत आणि शेखर कपूरची संगीताची जाण ह्यामुळे ह्यातली गाणी अजरामर बनली आहेत..
मला लताबाई जरी प्रचंड आवडत असल्या तरी गेले काही दिवस मी अडकलो आहे ते ह्या आरती मुखर्जीच्या गाण्यामध्ये…

गाण्याची लिंक
https://youtu.be/T1NtFQHEZhQ

©गौरीश देशपांडे

एक दिवस एक गाणं

एक दिवस ,एक गाणं

जर लोकांना विचारलं की तुमचं वेळ घालवण्याचं साधन काय, किंवा तुमचा छंद काय तर बऱ्यापैकी लोक गाणी ऐकणे हेच सांगतात.भारतीय लोकांच्या आयुष्यात गाण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. खरंच गाणी असतातच सुंदर,जीवनाचं मर्म सांगणारी, जगण्याला दिशा देणारी...80 चं दशक बॉलिवूडसाठी एक वाईट दशक मानलं जातं,पण या दशकातली गाणी मात्र बेस्ट..आजही कुठल्याही देशी सलूनमध्ये अल्ताफ राजाच जास्त ऐकला जातो..
किंवा मिरवणुकीत ' में हू डॉन 'हे गाणं वाजलं नाही अशी एकसुद्धा मिरवणूक नसेल..
तर अश्याच काही उत्तमोत्तम गाण्याचं कलेक्शन माझ्याकडे आहे.काही गाणी अशी आहेत त्यात किशोरकुमारनं तल्लीन होऊन खर्ज लावला आहे, मन्ना डेनं अप्रतिम असं क्लासिकल गायलं आहे.लताबाईंचे,किशोरीताई यांचे सूर म्हणजे तर स्वर्गच..

साथ साथ नावाचा एक पिक्चर आहे फारुख शेख आणि दीप्ती नवल यांचा.हा पिक्चर आहे 83 सालातला, ते दशक म्हणजे अस्वस्थतेचं प्रतीक मानलं जातं. समाजवादाबद्दलचं आकर्षण त्यानंतरची ती 'आणीबाणी' मग त्यानंतर जनता सरकारकडून झालेला लोकांचा अपेक्षाभंग.चांगला पर्याय कोण ह्या विचारत असलेली तरुणाई आणि त्यांच्या आयुष्यात होत असलेले बदल ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो. हा सिनेमा सुंदर गाण्यांनी भरलेला आहे.

ह्या सिनेमात गीता (दीप्ती नवल) ही एका प्रतिथयश उद्योगपतीची मुलगी असते.ती अविनाश (फारुख शेख) च्या प्रेमात पडते.अविनाश हा एक Idealistic तरुण असतो.त्याच्या त्याच्या वेगळ्या कन्सेप्ट असतात.त्या फॉलो करून तो एक आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो.
मग गीता आणि त्याचं लग्न होतं.मग गाणं येतं


ये तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो गर
तो पहले आ के माँग ले, मेरी नज़र तेरी नज़र
ये तेरा घर ये मेरा घर
ये घर बहुत हसीन है   ...

न बादलों की छाँव में, न चाँदनी की गाँव में
न फूल जैसे रास्ते बने हैं इसके वास्ते
मगर ये घर अजीब है, ज़मीन के क़रीब है
ये ईंट पत्थरों का घर, हमारी हसरतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर   ...

जो चाँदनी नहीं तो क्या, ये रोशनी है प्यार की
दिलों के फूल खिल गये, तो फ़िक़्र क्या बहार की
हमारे घर न आयेगी, कभी खुशी उधार की
हमारी राहतों का घर, हमारी चाहतों का घर
ये तेरा घर ये मेरा घर   …

नव्यानेच झालेलं लग्न,त्यांच्या आयुष्याची स्वप्नं,ती पूर्ण करण्यास येत असलेली असमर्थता तरी सुद्धा आहे त्यात गोड मानून छोटे छोटे क्षण जगण्याचा केलेला पुरेपूर प्रयत्न या गाण्यात उठून दिसतो.त्यात पुन्हा दीप्ती आणि फारुख ही जोडी म्हणजे अफाट..
एक प्रेमात पडलेली अल्लड तरुणी ते अविनाशला तू चुकतोयस हे ठामपणे सांगणारी बायको हा प्रवास तिने उत्तम साकारला आहे.आणि ते ओझं तिनं सहज पेललं आहे,फारुख बद्दल बोलेल तेवढं कमी पडेल..एक आदर्श विचारांना फॉलो करणारा तरुण ते आपल्या कौटुंबिक गरजा भागवताना त्याच आदर्शांची पायमल्ली होताना पाहून,परिस्थितीपुढे हात टेकलेला, आतल्या आत तुटणारा पण तोंडावर हास्य दाखवणारा अरुण चांगला वाटतो.
हे गाणं म्हणजे नव्यानेच लग्न झालेल्या,नव्या नव्या प्रेमात पडलेल्या लोकांसाठी एक अजरामर असं गाणं आहे.नवी स्वप्नं , नव्या दिशा, नवी जिद्द, नव्या आकांक्षा, नवी क्षितिजे यांचा पट रंगवणाऱ्या लोकांनी हे गाणं नक्की पाहायला हवं..
मग वाट कसली पाहताय, अडकवा इयरफोन्स आणि आनंद लुटा ह्या गाण्याचा.. ☺️

©गौरीश देशपांडे

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...