शाळा !!!!!!!........
प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनमोल ठेवा..
आज अचानक शाळेविषयी लिहायचं ठरवलं कारण
आज गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेत एक कार्यक्रम होता.
शाळेत गेलेलो, शाळा सोडल्यानंतर दोन वर्षांनी .
सगळं एक एक करून आठवत होतं , चालताना आईच धरलेल बोट असेल, बाबांची
पाठीवरली थाप असेल, मित्राला मारलेली मिठी
असेल किंवा सर्वांसोबत असताना, सर्वांची
नजर चुकवून, मैत्रिणीचा धरलेला हात
असेल.....शब्दांशिवाय या गोष्टी खूप काही
"बोलून" जातात .
लहानपणी आईबरोबर लक्ष्मी देवीच्या मंदिरात यायचो तेव्हा पलीकडच्या टेकडीवर असलेली शाळा पाहायचो .
भारी वाटायचं तेव्हा हे सगळं , आज एक एक आठवण मनाचा ठाव घेत होती
ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो, किती स्वप्न मित्रांबरोबर पाहिली, किती इच्छा तरुण झाल्या ,
कितीतरी गमती जमती केल्या. सगळं काही आठवत होतं
कार्यक्रम उत्तम पार पडला, काळे सरांचं यावेळी कॅसिओ बरोबर पुन्हा बिनसलं आणि त्यांनी नेहमी प्रमाणे पेटीला आपलंसं केलं.प्रत्येक शिक्षकाच्या डोळयात मी पहात होतो सगळे अगदी घरातील कार्य असल्याप्रमाणे लगबगीनं झटत होते. बर्गे मॅडमच सूत्रसंचालन , अहवाल वाचन , शाळेचा इतिहास मग ते मुख्याध्यापकांच तालासुरात वाचन , सगळं आठवलं अगदी कालपरवापर्यंत आपण याचाच तर भाग होतो
सगळ्या शिक्षकांशी अगदी आवर्जून 5 मिनिटे बोललो
त्यांच्या डोळ्यातले भाव अगदी स्पष्ट दिसत होते .फक्त
5 मिनिटे बोललो होतो आणि त्या पाचच मिनिटात शाळेची 6 वर्ष पुन्हा जगलो होतो ....
© गौरीश देशपांडे .......
पाटण
दिनांक - 9 जुलै 2017

This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteWhile reading your blog I just lost in school memories...
ReplyDeleteGreat work Gaurish.
Thank you Gandhar
ReplyDeleteGood one
ReplyDelete