खर मी असतो तरी कोण या जगाच्या दृष्टीने , एक साधा सरळ कुणाच्याही बेरजेत न येणारा असतो. आतून प्रचंड उलथापालथी सहन करत असतो, मला ना सरकारची पडलेली असते ना कुठल्या मागणीची . रोज लोकलच्या भयाण गर्दीतून त्याच ओळखीच्या पण अनोळखी वाटेवरुन जात असतो. घरी परतेन की नाही माहित नसतं. राजकारणी गरजेपुरतं वापरून सोडतात, मी आता ट्रेन मध्ये चढायला सुद्धा घाबरतो, रोज ऑफिसला जाताना बायकोला वाटतं की ऑफिसला नाही युद्धावर चाललाय , या विशाल भाऊगर्दीत माझ्यासारखे अनेक जण सापडतील तुम्हाला. बॉम्बस्फोट , चेंगराचेंगरी , ईत्यादी ठिकाणी मीच मरतो पण जग पुढे चालत राहत
कुणाला काही फरक पडत नाही . खर माणुसकी हरवलिये कुठेतरी. आपण आता हातात हात घालून एकत्रित पुढं गेल पाहिजे. अश्यावेळी एक भावना मनात येते,
"कोणीतरी यावं,काहीतरी बोलावं,काहीतरी विचारावं
असं खुपदा वाटतं…
मन काठोकाठ भरलेलं असतं,ते कुठेतरी रितं करावसं वाटत असतं ,पण त्यासाठी आपलं असं कोणीतरी हवं असतं….
आणि बहुतेकवेळा,कोणी असलं तरी असून नसल्यासारखच असतं …
अशावेळी,कोणीतरी यावं , काहीतरी बोलावं,काहीतरी विचारावं असं वाटत राहतं…
आजूबाजूला गर्दी असते , त्यात मी एकटाच चालत असतो
ओळखीची असूनही अनोळखी वाटणारी वाट एकटाच तुडवत असतो…
चालताना कल्पना नसते की पुढे अनेक अडथळे माझी आतुरतेने वाट बघत आहेत…
चालता चालता डगमगतो , तसाच चालत रहातो अडखळतो , पडतो , पुन्हा उठून चालू लागतो
अपयशाचे डोंगर चढताना , यशाचं शिखर केव्हा येईल हाच
विचार करत असतो…
ते शिखर मला केव्हातरी गवसेल ही आशा मनात असते…
परंतु त्याहीवेळी, कोणीतरी यावं , काहीतरी बोलावं , काहीतरी विचारावं असं
पुन्हा पुन्हा वाटत रहातं, पुन्हा पुन्हा वाटत रहातं…….
आपलाच गौरीश देशपांडे
(कालच्या मुंबई रेल्वे स्थानक दुर्घटनेतील माझ्या बांधवाना समर्पित)

No comments:
Post a Comment