Sunday, 1 October 2017

राजगडा रे राजगडा तुजवर जडली ही प्रीत असे

राजगड दर्शन हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.  राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा , नाजुक देशा कोमल  देशा फुलांच्याही देशा.  यातील प्रत्येक शब्द इथे अनुभवायला मिळतो.  अक्राळ विक्राळ सह्याद्री!  नजर  फिरवणारे त्याचे उत्तुंग कडे, दर क्षणाला नवीन भासणारी निसर्गाची रूपे किती किती अन काय काय सांगावे?  हे प्रत्यक्ष पहावे तेव्हा समजेल.

राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी.  शिवाजी महाराजांचे तब्बल २५ वर्षे इथे वास्तव्य झाले. इथून समोरच सिंहगड, पुरंदर, तोरणा हे गड दिसतात.  धुके नसेल तर, रायगडही दिसतो.  नुसत्या डोळ्याने. दुर्बिण वगैरे काही लागत नाही.

आता इथे माणसाचा वावर कमी.  पण निसर्गाची नवलाई भरपूर पहायला मिळते.  ऑर्किड च्या फुलांचे गुच्छ च्या गुच्छ.  सबंध गडावर तेरडा फुललेला असतो.  सगळा गड जांभळा दिसत असतो.  काही ठिकाणी पिवळी धम्मक सोनकी फुललेली असते.   पाऊस इतका प्रचंड, की झाडांच्या खोडावर शेवाळे आलेले असते. धुक्याचे लोट च्या लोट येत असतात.  सूर्य झाकोळून जातो. खारूची नावाचा एक देखणा शिकारी पक्षी तर इथे रहायलाच आहे.  उडता उडता हवेत थांबणे हे याचे वैशिष्ट्य.

राजगड दमवतो फार.  कुठल्याही बाजूने चढा.  दमणूक होतेच. पण नंतर मिळणारा आनंद इतका असतो की दमण्याचे काही वाटत नाही. इतिहास व निसर्गाशी नाते जुळते. आनंदाचे डोही आनंद तरंग उमटत रहातात. आणि आपोआप तोंडी शब्द येतात,  राजगडा रे राजगडा तुजवर जडली प्रीत असे!

हिरेन देशपांडे  , गौरीश देशपांडे 

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...