Saturday, 21 October 2017

#आठवणीतले मोबाईल्स
काहीही म्हणा आज काल मोबाईलशिवाय कुणाचे पान हलत नाही. उठता बसता , चालता , फिरता , आपल्याबरोबर असतोच तो आपल्या जिवाभावाचा साथीदार आपला मोबाईल .
जनरली तरुण-तरुणींमध्ये त्याला कुणीही हात लावलेलं आपल्याला चालत नाही .उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळे अगदी त्या फोनला चिटकून असतो.
तसं म्हणलं तर मला नवनवीन गॅजेट्स आवडतात .
नुकतीच आयफोनला 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षात मोबाईलनी आपल्या जीवनात क्रांती केली.  मी अगदीच लहान  असताना 2003/04 माझ्या एका मामाचा  कैमरा  असलेला फोन होता .त्याकाळी साधे फोन बघायला मिळत नसत, कॅमेरा असलेला फोन म्हणजे एक अप्रुपच होतं.हळूहळू तंत्रज्ञान वाढत गेलं आणि आपल्या हातात नोकिया 1100, नोकिया 3310 असे फोन्स दिसायला लागले. मग जनरली सगळ्यांकडे नोकिया आणि त्यात आयडिया किंवा एअरटेलच कार्ड ते पण 500 रुपयांच .
नोकिया 1100 त्यात असलेली ती स्नेकची गेम आणि ती नोकियाची रिंगटोन, नोकिया 1600  त्यांची फेमस BL-5C बॅटरी यांचा तो काळ . मिनिटाला डिड दोन रुपये असणारा.त्याकाळी मोबाईल दुकानं पण कमी , मोबाईल दुरुस्त करणारा म्हणजे देवच , महिन्याला 100 एसएमएस फ्री , 50 ला 44 रुपयांचा रिचार्ज मिळायचा .
2007 ला आयफोन बाजारात आला आल्या आल्या त्यांन मैदान मारलं. नोकिया भारतीय बाजारात पाय रोवून घट्ट उभा होता. सॅमसंगचा नुसताच चनचूप्रवेश झाला होता.नोकिया एक से बढकर एक मॉडेल्स आणत होता .
नोकियाने आयफोनच्या धरतीवर C6,N900 , 5235 come with music असे बहारदार फोन्स आणले . 2010 चा तो काळ , त्या नोकिया मध्ये मोशन सेन्सरनी पहिल्यांदा गेम्स खेळले. मजा वाटायची मी साधारणतः 5 वीत असेंन त्यावेळी.  मायक्रोमॅक्स , कार्बन , लाव्हा हे फोन्स त्यावेळी आले . त्या मधील लावाची बॅटरी जबरदस्त होती. आयफोन 4 एस आला आल्या आल्या अमेरिकेत वादळ केलं, स्टीव्ह जॉब्सच्या काळातला तो शेवटचा आयफोन. हळूहळू सॅमसंग आणि मायक्रोमॅक्स यांनी अँड्रॉइड टच स्क्रीन फोन्स आणले . मला आठवतंय सॅमसंगनी गलेक्सी वाय , स्टार थ्री हे फोन्स आणले होते त्यातली ती "व्हाय धिस रिपीट " ही टोकिंग टॉम ची ऍड .
हे सगळं नवीन होत आणि भारतीय मनाला रुचल. मग सॅमसंगनी जोरदार मुसंडी मारली.सॅमसंगची गलेक्सी सिरीज फार चालली , गलेक्सी कोर,गलेक्सी ग्रँड क्वाट्रो , ग्रँड नियो असे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारे उत्तमोत्तम हँडसेट्स आले.ती गलेक्सी ग्रँडची मुलाला शाळेचा प्रोजेक्ट बनवायला मदत करणारी ऍड मी कधी विसरू शकणार नाही. ते फ्लिपकवर पहिल्यांदा फार भारी वाटायचं . पॅटर्नच लॉक आणि पिनकोड पण नवीन फोन घेतल्यावर पॅटर्नच लॉक टाकताना I am king of the world ची फिलिंग यायची. मोबाईलला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल तो सर्वोत्कृष्ट अशी माझी धारण होती, मायक्रोमॅक्सनी कॅनव्हास , कर्बननि A 29 , A 33 अशी मॉडेल्स आणून समाजमनाला भुरळ पाडली.
यात LG ,htc ,अश्या कम्पनि देखील होत्या.
2013 मध्ये 5C , 5S अशी दणकेबाज मॉडेल अँपल नि आणली . 5S नी तर विक्रीचा उच्चंक केला.  मोटोरोलाने मोटो जी , मोटो इ यासारखे फक्त ऑनलाइन मिळणारे फोन्स आणून जोरात  हवा केली. या सगळ्यात आपला जिवाभावाचा नोकिया कुठेतरी हरवून गेला होता.नोकियाने पण मग लुमिया 920, 820, 730 X ,XLase phons, आणले पण ते फार चालले नाहीत.  इथूनच नोकियाच्या अधोगती सुरुवात झाली . 2014 मध्ये ओप्पो आणि विवो,  भारतात आले आणि खऱ्या अर्थानी स्मार्ट फोनचं वलय सम्पलं . लेनोव्होनी A6000  
फोन आला आणि मग फोनच्या किंमती कमी होऊ लागल्या , कमी पैशात जस्तुत जास्त फैसीलिटी कोण देतंय यात जणू स्पर्धा लागली . मधनंतरी सॅमसंग हँग होतो,म्हणून त्याचा खप कमी झाला पण सॅमसंग जे सिरीज नी त्याला वर काढलं . आता  नोकिया पण सेट झालाय .
एकूणच काय या दहा वर्षात मोबाईलनी जीवनात आमूलाग्र बदल केले .ऑर्कुट, फेसबुक, मेल , पेमेंट्स सगळं काही मोबाईलवर आलं . ह्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही पण जीवन सुखकर झालं हे मात्र खरं .
© गौरीश देशपांडे

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...