Monday, 9 October 2017

#एक रात्र सिंहगडावर
साधारणतः ऑगस्ट एंडला रोहित दादांनी एक पोस्ट केली की यावर्षीचा  एक रात्र साजरी करण्याचा प्रोग्राम हा सिंहगडावर होणार आहे .पोस्ट वाचून पहिल्यांदा खूप आनंद झाला कारण सिंहगड साताऱ्यापासून जवळ ,पटकन जात येईल आपल्याला अशी भावना मनात आली . पण रोहित दादांनी एक बॉम्ब टाकला की सिंहगडावर फक्त 60 लोकांचिंच रहायची व्यवस्था आहे . जे कोणी प्रथम येईल त्याला आम्ही प्राधान्य देऊ . मी एक क्षणाचा विलंब न लावता फोन केला पण रोहित दादांनी फोन उचललाच नाही मग एका मागोमाग एक असे 4/5 फोन केले मला वाटलं की आपल्याला उशीर झाला बुकिंग पूर्ण झाल  असेल म्हणून फोन उचलत नसतील.पण माझ्या सुदैवानी अस काही झाल नव्हतं रोहित दादा बाइक चालवत होते म्हणून फोन उचलत नव्हते .मग पटकन बुकिंग केल आणि निर्धास्त झालो आता फक्त तो दिवस यायची वाट बघत होतो . रोज एक एक दिवस सरत होता अन उत्सुकता वाढत होती .
अखेर तो दिवस उजाडला 7/10/17 माझ्या आयुष्यातील सर्वात मेमरेबल दिवस
सकाळी लवकर उठलो (टिप- येथे 8 म्हणजे लवकर आहे  कारण आदल्या दिवशीच परीक्षा सम्पली होती )
11 वाजता सातारा पुणे एसटी ने 1 वाजता पुण्याला पोहोचलो मग आमचे परममित्र श्री पुष्कराज घाटगे उर्फ बालकलाकार याला फोन लावला
विचारले कुठे आहात, व ते म्हणाले टिळक रोडला ये .
आवाजात नैसर्गिक तुसड़ेपणा होता ( पुणेरी ) . रिक्षतुन तलक रोडकड़े यायला निघलो तर परत पुष्कराजचा फोन  एस पी कोलेज जवळ उतर म्हणून मग  उतरलो
मग तो म्हणलाकी सरळ चालत ये ,
मी लागलो चालायला चांगला 700 मीटर तरी चाललो परत साहेबांचा फोन आहे तसा मागे ये
मी मगे येतोय येतोय है काही सापडेनातच , एव्हाना माझी अवस्था 'गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा' अशी झाली होती अखेर सापडले .फेसबुकवर भेटलेले मित्र काल प्रत्यक्षात भेटले ते म्हणजे शुभंकर अत्रे , सुधांशू कविमंडन , अक्षय जोग . मग अक्षय जोग सरानी आम्हाला फार फिरवलं आणि खाऊ पण घातलं , आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो पण 5 ते 10 मिनिटात समरस झालो. अक्षरधाराला भेट देऊन उत्तमोत्तम पुस्तके घेतली आणि सिंहगडावर निघालो. सारसबागे पासून  रिक्षा केली आम्हला आमचे एक मित्र श्री सागर कुलकर्णी  जॉईन झालें मग सुरु आमचे मिशन सिंहगड .
आधीच 4 ला पोचायची डेडलाईन होती आणि आम्हला सारसबागेपाशीच पावणेचार वाजले होते. रिक्षात सुरू झाले शुभंकर विरुद्ध पुष्कराज पुणे वरसेस जळगाव वॉर.शुभंकर के ऐकतोय बोलायला शेवटी तो तर वकिलच, वरून मध्ये मध्ये तेल ओतायला मी
शेवटी पुणे कशी वाईट सिटी आहे हे पुष्कराजला आम्ही पटवून दिले पण तो लगेच एक्सेपशन तर असतच अस करून बोळवण करत होता.
त्या रिक्षेवल्याने आम्हला डोणजे येथे सोडले. तिथून अजून एक रिक्षा करून आम्ही गड  पायथ्याशी च  मध्येच एक पीएमपीएमेलची बस आडवी आली , रिक्षावाला फार तापला , बस ड्रायव्हर काय ऐकतोय ," आता मुंडेंचा शिष्य ना तो" शेवटी ते कसेतरी थांबले आणि त्यांनी आम्हाला पायथ्यापाशी सोडले.तिथे  कौस्तुभ पंत , शिवराम पंत आणि IP चे सदस्य भेटले  तिथून एका जीपमधून आम्ही 14 जण निघालो, आम्ही सहा जण जीपच्या मागील भागात बसलो आणि भरीला भर म्हणून शुभंकर मागे मी बारीक असल्याने माझं पार सँडविच झालं होतं . अखेर अर्धातासाने आम्ही सिंहगडावर पोहोचलो.तपोर्यंत साडेपाच झालेले.तिथून ते आपटे बंगल्यावर गेलो,बॅगा ठेवल्या , फ्रेश झालो , फोटो बरेच काढले, विचार केला स्टेटस अपडेट करून हवा करू, पण फोनला रेंजच नव्हती तोवर वाजले सव्वासहा रोहित दादांनी सगळ्यांना हॊल मध्ये बोलवले आणि  शिवरायांच्या आरतीने कार्यक्रम सूरु झाला पहिल्याच आरतीने वातावरण इतके भारावून टाकले होते की पुढचे काही तास परमोच्च आनंदाचे आहेत हे आपोआप समजले.मग रोहितदादा , जोशी सर यांनी ग्रुपची सुरुवात आतापर्यंतची वाटचाल सांगितली मग  यानंतर प्रत्येकाने स्वताची ओळख सांगितली , बुलढण्यापासून कोल्हापूरपर्यंत च्या गावातून लोक आलेले. या ओळखिच्या सेगमेंट संपायला 9 वाजले .प्रत्येकजण अगदी भरभरून बोलत होता. एव्हाना पोटात कावळे ओरडून झोपी गेले होते . मग जेवणं आले साधेसेच परंतु जेवण  अतिशय रुचकर होते,अहा उसळ तर काय होती, दिवस भराचा शीण क्षणात नाहीसा झाला. मग परत जेवणानंतर बैठक परत जमली. यानंतरचा इतिहासावरील प्रश्नमंजुषेचा सेगमेंट होता. पहिल्याच प्रश्नाचे उत्तर मी दिले, पण पूढे मी फिका पडत गेलो आणि प्रश्न गडद होत गेले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण श्री सचिन जोशी सर यांनी सिंहगडाची माहिती सांगितली तोवर चहा आला सगळे चहा पिऊन जर ताजे झाले . लोकमान्य आणि सिंहगड यांचे एक अनोखं नातं आहे. टिळक म्हणायचे की 'सिंहगडावरच्या वास्तव्यात मला स्वतंत्रता लाभते 'याच टिळकांचे आणि सिंहगडचे  नाते सांगणारी गदिमांनी लिहिलेली एक कविता मी सादर केली.त्यानंतर आपले पंडितजी म्हणजे श्री सुंधशुराव कविमंडन साहेब  यांनी टिळक आणि सिंहगडची अहिती सांगितली , सुधांशुरावना एवढे संस्कृत श्लोक कसे काय आठवतात हे  कोड मला अजून सूटलेलं नाही .नाहीतर माझं संस्कृत देवपाशी सुरु होऊन दहावीच्या बोर्डाच्या पेपरपाशीच सम्पले . यानंतर सुमारे रात्री दिड वाजता आम्ही सिंहगड भटकायला सुरुवात केली जोशी सर आम्हाला त्या कड्यापाशी घेऊन गेले जिथून तानाहजी वर आले हिते.रात्री दिड वाजता तो रोमांचकारी इतिहास ऐकून अंगावर काटा आला. 400 वर्षांपूवरी ज्यावेळी ज्याकड्यावरून तानाजी चढले त्याचवेळी आम्ही त्याच ठिकाणी  त्यांचा पराक्रम ऐकत  होतो . कोंबून जीपमधून आल्याची वेदना कुठच्या कुठे पळाली.
सगळे परतलो त्यावेळी अडीच वाजला होता. चतुर लोकांनी पटकन जागा पकडल्या, आम्हा 5 जणांना जागाच नव्हती ,मी खुर्च्या आणल्या आणि रात्री अडीच वाजता आपटे बंगल्याच्या प्रशस्त आवारात पुस्तके वाचत बसलो . मंद पहाटेच्या थंड हवा , आम्ही ती रात्र खरोखर जागलो, माझा उत्साह कमी नव्हता पण डोळे पॅव्हॅलीयन कडे मला ओढून नेत होते अखेर मी आत गेलो , तिथे बारीक असल्याचा फायदा झाला , एक निमुळत्या जागेत मी घुसलो मग थोडे इकडे थोडे तिकडे आक्रमण करून बरोबर  जागेत झोपलो .लवकर उठलो 6 वाजता गनिमी काव्याने फोन चार्ज केला.
 भरपेट नाश्ता 8 वाजता झाला मग सिंहगडावरच्या भटकंतीला सुरुवात झाली. सचिन सर आम्हाला पुणे दरवाजपासून ते राजाराम महाराज समाधीपर्यत सर्व ठिकाणे अगदी पूर्णपणे समजावुन सांगितली .माझ्या तीन फालतू प्रश्नांची उत्तरे हसतमुख राहून दिली.  मी त्या दोन दिवसात प्रचंड शिकलो ,इतक्या मोठ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधता आला , त्यांच्या सहवासात दोन दिवस राहत आले याहून मोठा आनंद तो कैसा .
येताना शंतनू परांजपे उर्फ फिरस्तीकार नावाच्या अवलीयाची भेट झाली .भटकंतीवर बरीच चर्चा झाली . आपल्या ग्रुपचे लाडके व्यक्तिमत्व सौरभ रत्नपारखी यांना खूप  मिस केले.
हे सर्व पुण्यात आल्यामुळं शक्य झाले.
खरंच माणसानं निसर्गाच्या गडकिल्याच्या सहवासात गेलं पाहिजे .यात तुम्हाला स्वतःचा शोध घेता येईल आणि निसर्ग तुमच्याशी स्वतःहून बोलेल. माणसाने सरळ सह्याद्रीच्या मैदानात बागडत सुटावं, सह्याद्री अभेद्य आहे तो तुम्हाला नक्कीच सामावून घेईल .
समर्थानी तर म्हणलय "मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी, कथा आदरें राघवाची करावी , नसे राम ते धाम सोडोनि द्यावे , सुखालागी अरण्ये सेवीत जावे." या दोन दिवसात मी नव्याने जगायला शिकलो, अनेक दोस्तांना भेटलो ,ही आठवण माझ्या आयुष्यातील मोलाची साठवण आहे, ह्या आठवणींचा ठेवा मला चिरकाळ पुरेल.
©गौरीश देशपांडे 

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...