माझ्या मनी भाव साठले फार
आतल्या आत साठवत मग गेलो
दिशा स्वप्नांना नव्हत्या नेटक्या
परि रोज स्वप्ने पहात मी गेलो
बोनस दिला वेदनांनी अचानक
तुझे रूप मग मी आठवीत गेलो
दुःखाला नव्हत्या सीमा तरीही
आनंद अंतरात विणत गेलो
उद्याच्या अन्नाची होती चिंता
पोटापायी अपमान गिळत रोज गेलो
जरी नशीब आज आहे फितूर
कर्माने उद्याचे हेर पेरत गेलो
दिली नाही साथ कुणीजरी
स्वप्ने सत्यात उतरवत गेलो
©गौरीश
आतल्या आत साठवत मग गेलो
दिशा स्वप्नांना नव्हत्या नेटक्या
परि रोज स्वप्ने पहात मी गेलो
बोनस दिला वेदनांनी अचानक
तुझे रूप मग मी आठवीत गेलो
दुःखाला नव्हत्या सीमा तरीही
आनंद अंतरात विणत गेलो
उद्याच्या अन्नाची होती चिंता
पोटापायी अपमान गिळत रोज गेलो
जरी नशीब आज आहे फितूर
कर्माने उद्याचे हेर पेरत गेलो
दिली नाही साथ कुणीजरी
स्वप्ने सत्यात उतरवत गेलो
©गौरीश
No comments:
Post a Comment