Thursday, 15 February 2018

खरंतर मी विश्वस्त कादंबरी घेण्यासाठी खूप उत्सुक होतो,पण मला लेखकांची सही असलेली कादंबरी हवी होती, मी वसंत लिमये सरांना त्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण होऊ शकला नाही, मी ऑनलाइन पुस्तक मागवू शकत होतो पण सहीसाठी सगळं अडलं होतं,शेवटी 8 जानेवारीला सातारा पुस्तकप्रदर्शनातून विश्वस्त घेतलीच,आणि दोनचार दिवसातच पुन्हा फेसबुकवर वाचलं की लेखकाच्या सहीसोबत विश्वस्त मिळतीय मी म्हणलं जरा थांबायला हवं होतं, पण पुस्तक वाचायला घेतलं होतं.
एक कादंबरी म्हणून विश्वस्त एक बाप कादंबरी आहे.
कृष्णाचा काळ ते 2013 हा प्रवास थक्क करणारा आहे स्थळ, काळचे संदर्भ एकदम करेक्ट दिले आहेत.एवढंच काय रस्त्यांची वळणं सुद्धा खरी आहेत,मी दिवसाला सत्तर पानं या गतीनं वाचत होतो, हळूहळू एक एक पट उलगडून दाखवण्याची किमया लेखकांनी अतिशय सुंदर रीतीनें साधली आहे.जेएफके ग्रुप ,त्यातलं प्रत्येकाच मूळ, प्रत्येकाच वेगवेगळं प्रोफेशन पण त्यांच्यातला इतिहासाची  आवड हा कॉमन दुवा,रहस्यमय गोष्टींचा शोध घेण्याची उत्सुकता आणि त्या उत्सुकतेबरोबर आलेली जबाबदारी लिमये सरांनी खूप नेटक्या पद्धतीने मांडलेली आहे.एकेक पान पुढे गेल्यावर आता 'काय होईल आता काय होईल' ही उत्कंठा वाढत जाते.त्यातील प्रत्येक पात्र आपलंसं वाटतं,त्या पत्राबरोबर आपण रिलेट करत जातो.मला त्यातलं आवडलेलं पात्र म्हणजे मॅक आणि ज्यो.मॅक आवडायचं कारण म्हणजे त्या सर्वांच्यात कमी शिक्षण असूनसुद्धा मुळापर्यंत शोध घेण्याची तयारी. सर तुम्ही मॅकला उगाच मारलं त्या कथेत. ज्यो आवडली म्हणजे ती आजच्या काळातील सक्षम स्त्रीचं रूप आहे.स्कॉटलंडवरून येऊन मराठी शिकून इथे 4 अनोळखी मित्रांसोबत रिसर्च करणं,आणि पीएचडीसाठी एक वेगळा विषय निवडणं ह्या ज्योच्या कौतुकास्पद गोष्टी.अश्या सगळ्या वळणांवळणातून शेवटी त्या सत्यापर्यंत जेफेके टीम पोहोचते,प्रसादचा अचानक मृत्यू मात्र चटका लावून जातो.
हे सगळं रमवणारं गूढ पाचशे पानात लेखकांनी अत्यंत सुलभ मांडलय.मराठीत अशा दर्जाची कादंबरी सहसा वाचायला मिळत नाही,पण लेखक महोदयांनी ते शिवधनुष्य लीलया पेलून सर्व वाचकांना विश्वस्तच्या माध्यमातून एक सुंदर भेट दिली आहे....

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...