नको विचार करू एवढा
कधी कधी माझं मन मला सांगतं
नाही परतणार ती आता
गोड आठवणीनी डोळा पाणी दाटतं
विरहाच्या या काळात मला
क्षण अन क्षण व्याकुळ होतं
वाट तर पहावीच लागेल
कारण कोशातूनच फुलपाखरू निघतं
या एकांतात मला रोज
माझंच मन खायला उठतं
लवकरच येशील तू असं
मानून तुला साद घालतं
केव्हातरी तू नाहीस म्हणून
अंतर चोरासारखं दुसरीकडे पाहतं
देह जरी दुसरीकडे असला
पण मन मात्र तुझ्यातच राहतं
तुझ्यातच राहतं
गौरीश देशपांडे ....
कधी कधी माझं मन मला सांगतं
नाही परतणार ती आता
गोड आठवणीनी डोळा पाणी दाटतं
विरहाच्या या काळात मला
क्षण अन क्षण व्याकुळ होतं
वाट तर पहावीच लागेल
कारण कोशातूनच फुलपाखरू निघतं
या एकांतात मला रोज
माझंच मन खायला उठतं
लवकरच येशील तू असं
मानून तुला साद घालतं
केव्हातरी तू नाहीस म्हणून
अंतर चोरासारखं दुसरीकडे पाहतं
देह जरी दुसरीकडे असला
पण मन मात्र तुझ्यातच राहतं
तुझ्यातच राहतं
गौरीश देशपांडे ....
No comments:
Post a Comment