Sunday, 18 February 2018

आवडते दिवस आवडतं गाणं

#आवडते_दिवस_आवडतं_गाणं
कॉलेजमधलं आयुष्य खूप रंग उधळत येतं. गडद, फिके, बटबटीत, आल्हाददायक … कुठल्याच रंगाची कमतरता नसते. सगळ्यांसारखंच मीही त्यात चिंब भिजून घेतलं. माझा कॅनव्हास त्या रंगांनी जमेल तसा आणि जमेल तितका रंगवून घेतला आहे आणि ते रंग आयुष्यभर पुरूनही वर उरणारे आहेत.
ती किती सुंदर होती.मी पाहताच तिच्या प्रेमात पडलो होतो.आमच्याच कॉलेजला होती ती.मी तिला रोज पहायचो,माझा क्लास झाला की तिच्या क्लासबाहेर जाऊन उभा रहायचो फक्त तिला पहायला.कधीही कॉलेजात आलो की पहिली नजर तीला शोधायची.एव्हाना तिच्याही हळूहळू लक्षात यायला लागलं होतं ते. ती जास्त कधी थांबायची नाही, लगेच जायची. एकदा कॉलेजमध्ये कविता सादर करायचा कार्यक्रम होता, मला त्यात फार इंटरेस्ट नव्हता,पण मित्रांना माझ्या कविता खूप आवडायच्या म्हणून मी कविता स्पर्धेत भाग घेतला आणि 'आठवण' कविता सादर केली.त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला, मी स्टेजवर बक्षीस घ्यायला गेलो,आणि बक्षीस घेऊन खाली उतरत असताना माझी आणि तिची नजरानजर झाली.स्टेजच्या डाव्या कोपऱ्यात ती उभी होती तिनं हात उंचावुन मला विश केलं.हळूहळू आमच्या भेटी-गाठी वाढू लागल्या.अलमोस्ट रोज आम्ही भेटायचो.मी तिला जाणून घ्यायचं प्रयत्न करायचो. कधी कधी फिरायला जायचो ,कॉलेज बंक करून सिनेमे, नाटकं व्हायची,मजा मस्ती चालायची.हळूहळू मित्रांमधून आमचं नाव एकत्र घेतलं जायचं.खूप भारी वाटायचं सगळं ते. एके दिवशी मी तिला प्रपोज केलं, तिनं लाजून हो म्हणलं.किती सुंदर लाजली होती ती त्यावेळी...
घडल्या गोष्टीला आता अडीच वर्षं उलटली होती. मागचे सहा महिने मी पूर्ण एकटा होतो.एकाकीपणे जीवन जगत होतो.त्या धक्क्यातून अजून पूर्णपणे सावरलो नव्हतो सावरायचा प्रयत्न करत होतो.गेल्या वर्षीच्या शेवटीच म्हणजे बरोबर सहा महिन्यांपूर्वीच ती मला शेवटची भेटली होती.कडाक्याची भांडली होती त्यावेळी ती. अर्थात चूक देखील माझीच होती म्हणा मी त्यावेळी पूर्णपणे सेटल नव्हतो झालो. इव्हन आमच्या सगळ्या फ्रेंडसर्कल मध्ये मीच जॉबलेस होतो.हेच तिला खुपत होतं ,तिनं मला समजवायचा खूप प्रयत्न केला तरी मी माझ्याच कोशात अडकलो होतो.त्यातून बाहेर पडायचे नव्हतं मला.मला माझा इगो नडत होता, माझं जग मला आनंददायी होतं. त्यातून माझी बाहेर पडायची ईच्छा नव्हती किंवा मी बाहेर पडायलाच घाबरत होतो.तिला माझ्याविषयी खूप वाटतं होतं पण मीच त्याचे वेगळे अर्थ काढत होतो. किती भांडलो होतो मी तिच्याबरोबर. अखेर व्हयचं तेच झालं किती काळ सहन करेल बिचारी गेली मला सोडून...
ती गेल्यावर मला एकदम झटका बसल्यासारख झालं, मी दोन चार दिवस टिपिकल ब्रेकअप मूड मध्ये घालवले. दारूला जवळ केलं, पण त्यात देखील मन रमलं नाही .मी तिला सगळीकडे शोधत होतो. मी पूर्ण एकटा पडलो होतो अगदी एकटा ... एकटेपणा मला खायला उठला होता. ह्या सहा महिन्यात मी स्वतःला पूर्ण ऍनालाईज केलं होतं.जिथं चुकलो तिथं पुन्हा चुकणार नव्हतो.नोकरीचा निश्चय केला होता.....
या सगळया काळात मी मित्रमंडळींपासून दुरावलो होतो,एक दिवस एका मित्राच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो घरी बोलवायला आला आणि पार्टीच निमंत्रण दिलं मी जाणार नव्हतंच तरी त्याला माझी परिस्थिती माहिती होती, माझ्या मनाला मोकळीक मिळावी म्हणूनच तो आला होता. त्यानं खूप आग्रह करुन वाढदिवसाला यायला सांगितलं. वाढदिवसादिवशी मी आवरलं , कार काढली आणि निघालो.पोहोचलो आणि एकटाच एका टेबलावर जाऊन बसलो.वेटरनी सरबत आणून दिले. मी सरबताकडं नुसतच पाहिलं आणि ग्लास तसाच टेबलवर ठेवला.मित्र हसत खिदळत होते. स्वतःबद्दल सांगत होते. मी खोटं हसू चेहऱ्यावर आणून ते ऐकत होतो, तेवढ्यात माझी नजर दरवाजाकडे गेली. दरवाजातून ती येत होती. फिक्कट गुलाबी रंगाची साडी नेसून हातात बुके घेऊन ती स्टेजकडे गेली.केसातील चाफा तिचं आरसपानी सौन्दर्य अजून खुलवत होता.तिनं माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात मला ते दिसलं पण चेहऱ्यावर काही भाव न दाखवता ती जायला निघाली. एव्हाना मी मनाची पूर्ण तयारी केली होती.म्हणलं मिस्टर अभी नही तो कभी नही, तिच्या मागून गेलो तिचा हात हातात घेतला आणि तडक गाडीकडे आलो, तिला गाडीत बसायला सांगितलं, ती बसली... मी बसलो आणि गाडी सुरू केली. मी गाडी चालवत होतो ती गप्प होती आणि मला बोलायचं धाडस नव्हतं शांतता संपवायला मी गाणी लावायचं ठरवलं आणि एफ एम सुरू केलं आणि गाणं लागलं.......

तेरे मेरे मिलन की ये रैना...
तेरे मेरे मिलन की ये रैना
नया कोई गुल खिलायेगी
तभी तो चंचल हैं तेरे नैना
देखो ना
देखो ना,  तेरे मेरे मिलन की ये रैना
 
नन्हां सा गुल खिलेगा अँगना
सूनी बइंयाँ सजेगी सजना
जैसे खेले चंदा बादल में
खेलेगा वो तेरे आंचल में
चंदनिया गुनगुनायेगी
तभी तो चंचल हैं तेरे नैना, देखो ना ...

तुझे थामे कई हाथों से
मिलूंगा मदभरी रातों में
जगा के अनसूनी सी धड़कन
बलमवा भर दूंगी तेरा मन
नई अदा से सतायेगी
तभी तो चंचल हैं तेरे नैना, देखो ना ....
अभिमान चित्रपटातलं हे हृदयाचा ठाव घेणारं गाणं..
त्या गाण्यात अमिताभ आणि जया यांचं विश्व दाखवलंय. अमिताभ आणि जया दोघेही उत्तम गायक असतात. जया ही अमिताभच्या पत्नी असते . तो तिला गायनाच्या क्षेत्रात आणतो,जया सुंदर गात असते.तिला हळूहळू यश मिळू लागतं,दिवसेंदिवस ते यश एवढं मोठं होतं की अमिताभ तिच्यावर जळायला लागतो त्याचा पुरुषी अहंकार जागा होतो.मग त्यांच्यात भांडणाला सुरुवात होते. ती भांडणे एवढी टोकाला जातात की त्यात त्यांचं मूल जातं, जया पूर्ण एकटी पडते ,गाणं सोडून देते. ह्या गाण्यात ते सगळं दाखवलंय शेवटी अमिताभला त्याची चूक कळते, ह्या गाण्यात मूल गेल्यानंतर तुटलेली उमादेवी  फार सुंदर साकारली आहे. चुकीची जाणीव झालेला अमिताभ तिला बोलावतोय तिच्यातील गाणं जागं करायचा प्रयत्न करतोय.तो म्हणतो की ही रात्र आपल्या मिलनाची आहे, तुझे डोळे खुप चंचल आणि सुंदर आहेस तेव्हा तू अशी दूर जाऊ नको आपल्या प्रेमाची ही रात्र आपण साजरी करू... खरोखरच मजरुह सुल्तानपुरी यांनी शाब्दिक शृंगाराचं उत्तम उदाहरण म्हणून हे गाणं लिहिलंय..,सोबतीला एसडी बर्मन यांचं अफाट संगीत आहे.लताबाईंनी आणि किशोर कुमारांच्या आवाजानं हे गाणं सजलय.......
आणि हळूहळू गाणं पुढे सरकू लागलं तसं तिच्या डोळ्यातुन पाणी यायला लागलं . तिचे ते आर्त श्वास मला जाणवू लागले. मी गाडी थांबवली आणि गाणं संपलं. जसं गाणं संपलं तसाच मी गाडीतून खाली उतरलो, ती सुद्धा उतरली.आम्ही एकमेकांना आवेगानं मिठी मारली.तिच्या अश्रूंनी माझी छाती भरली होती... ही मिठी मारली होती ती न सोडण्याकरता कारण बंध पुन्हा जुळला गेलास होता कायमचा......

©गौरीश देशपांडे

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...