तर एकदा काय झालं, नक्की काय झालं हे मलाच आठवत नाही पण माझं मन ताळ्यावर नव्हतं कुठल्या विचाराच्या तंद्रीत होतो,मानसिक ताणतणाव भरपूर होता.गेले काही दिवस कामच बोजा फारच वाढला होता, मरेतोवर काम आपण करायचं आणि क्रेडिट मात्र दुसऱ्याला असा काहीसा प्रकार होता तो, मी मात्र आतल्या आत कोंडलो गेलो होतो, घुसमट तरी कोणाजवळ व्यक्त करायची ,घरी आई एकटी होती, खूप काळजी करायची ; दिवसातून तीन चार वेळा फोन यायचे... काम एवढं होतं की खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती आणि तेवढ्यात आईचा पोचलास का ऑफिसला ?
म्हणून फोन आला. ऑफिसमध्ये आधीच एका महत्वाच्या कामावर डिस्कशन चाललं होतं आणि त्यात हा फोन, मी फोनवर अक्षरशः किंचाळलो आणि फोन टेबलावर लिटरली फेकला.. खुर्चीत मान टेकवून तसाच काही वेळ पडून राहिलो, मग एकदमच मॅनेजरला मला ' सिक लिव्ह ' हवी आहे असा मेसेज टाकला , गाडी काढली आणि ऑफिसमधून निघालो....
निघालो काय अडकलो, ऑफिसच्या पुढच्या चौकातला सिग्नल बंद होता . एक ट्रॅफिक हवालदार वाहतुक नियंत्रित करत होता मग काय सगळा बट्ट्याबोळ ..वातावरणात सगळा उबग भरून राहिला होता.. शेवटी अर्ध्यातासाभरात शहरातून बाहेर पडलो आणि हायवेला लागलो
मी कुठे चाललो होतो मलाच माहिती नव्हतं, रस्ता फुटेल तिकडं जायचं मी ठरवलं होतं. गावाच्या बाहेर पडल्यापासून मला तासभर उलटून गेला होता.. थोड्याच वेळात सातारा आला, पोटात कावळे ओरडायला लागलेच होते आणि ह्या कामाच्या व्यापात काय खायला पण जात नव्हतं ..
**कात गेली दुनियादारी ह्या निर्धारावरच ऑफिस मधून बाहेर पडलो होतो.. एका ढाब्यावर मस्त जेवलो आणि जरा हातपाय मोकळे केले पण मी अजून आईवर जाम रागावलो होतो,आईला एक साधा मेसेज टाकला की ' मला तुझ्याशी बोलायचं नाहीये जा ' म्हणून आणि पुन्हा गाडी चालवायला लागलो .. एव्हाना दुपार होत आलेली आणि मी कोल्हापूर पर्यंत आलेलो तसाच पुढे गेलो आणि राधानगरी मधून फोंडा घाटाने खाली कोकणात उतरलो.. मी कुठं होतो हे फक्त मला माहिती होतं फक्त ,ना आईला ना बॉसला ,फक्त मला आणि माझ्या अंतरातम्याला...
6 च्या सुमारास देवबागला पोहोचलो..डोक्यात काही नसलं ना की माणूस काहीही करतो तसा माझा देवावर थोडाफार विश्वास आहे म्हणजे मी म्हणतो की माणसाने बॅलन्स असावं आणि देवळात दर्शन घेण्याततही काही इंटरेस्ट नव्हता पण पुढे आलेला प्रसाद हवाहवासा होता.प्रसाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो एव्हाना साडेसहा वगैरे वाजले असतील तसाच चालत बीचवर आलो आणि एकटक त्या क्षितिजाकडे पाहत आयुष्यातल्या घटकांची आकडेमोड करू लागलो त्यातून असं लक्षात आलं की मी मात्र अनेकांना बेरजेत धरलं होतं पण त्यांनी मला त्यांच्यातून वजा केलं होतं. त्या संपुर्ण बीचवर जास्त कुणी नव्हतं,दूरवर एक स्त्री आणि एक लहान मुलगा होता.. त्यांना सोडल्यास मी त्या बीचवर पूर्ण एकटा होतो अगदी एकटा.. मी चालू लागलो ती स्त्री आणि तिचा मुलगा हळूहळू जवळ यायला लागले. मला तर काही उद्योग नव्हताच मी तो मुलगा काय करतोय हे लांबून अंतर ठेवून पाहायला लागलो.तो त्या रेतीत काहीतरी शिल्प काढायचा प्रयत्न करत होता.. तो अगदी छोटा म्हणजे 5/6 वर्षाचा असावा. तो काही तरी करत होता पण त्याला ते जमत नव्हते .. मग तो त्याच्या आईकडे नुसते पहायचा आणि त्याची आई त्याला ते करून द्यायला मदत करायची.. असं 5/6 वेळा झालं असेल, प्रत्येक वेळी त्याची आई त्याला न हसत हसत मदत करायची ..भरतीची वेळ होती अचानक पाणी फार पुढं आलं आणि त्या मुलाच्या शिल्पावरून गेलं..त्याच्या आणि त्याच्या आईच्या प्रयत्नांवर पाणीच पडलं. तो मुलगा रडायला लागला , हिरमुसला.. आईने त्याला जवळ घेतलं ,समजवून देऊ लागली.. मला वाटलं हे इथून आता जातील पण हटेल ती आई कसली ? तिने त्या मुलाला काय सांगितलं काय माहिती ? पण पुढच्या पाचच मिनिटात तो आणि त्याची आई हसतमुखाने एकत्र ते शिल्प पूर्ण करू लागले..
मी तो प्रसंग पाहून अंतर्मुख झालो होतो.मनाच्या बॅगराऊंडवर गाणं सुरू झालं होतं.. मी कम्प्लिट डोळे मिटून घेऊन ते गाणं ऐकत होतो..
लुका छुपी बहुत हुई सामने आ जा ना
कहां-कहां ढूंढा तुझे
थके है अब तेरी मां
आजा सांझ हुई क्या बताऊं मां कहां हूं मैं
कहां-कहां ढूंढा तुझे
थके है अब तेरी मां
आजा सांझ हुई क्या बताऊं मां कहां हूं मैं
यहां उड़ने कोमुझे तेरी फिकर
धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा ना
मेरे खुला आसमान है
तेरे किस्सों जैसा भोला सलोना जहां है
यहां सपनो वाला
मेरी पतंग हो बेफिक्र उड़ रही है मां
डोर कोई लुटे नहीं बीच से काटे ना
आजा सांझ हुई..
तेरे किस्सों जैसा भोला सलोना जहां है
यहां सपनो वाला
मेरी पतंग हो बेफिक्र उड़ रही है मां
डोर कोई लुटे नहीं बीच से काटे ना
आजा सांझ हुई..
तेरी राह ताके अंखियां
जाने कैसा कैसा होए जिया
धीरे-धीरे आंगन उतरे अंधेरा, मेरा दीप कहां
ढलके सूरज करे इशारा चंदा तू है कहां
मेरे चंदा तू है कहां
आजा सांझ हुई..
जाने कैसा कैसा होए जिया
धीरे-धीरे आंगन उतरे अंधेरा, मेरा दीप कहां
ढलके सूरज करे इशारा चंदा तू है कहां
मेरे चंदा तू है कहां
आजा सांझ हुई..
कैसे तुझको दिखाऊं यहां है क्या
मैंने झरने से पानी मां तोड़ के पिया है
गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का उछल के छुआ है
छाया लिया भली धुप यहां है
नया-नया सा है रूप यहां
यहां सब कुछ है मां फिर भी
लगे बिन तेरे मुझको अकेला
आजा सांझ हुई मुझे तेरी फिकर धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा ना
मैंने झरने से पानी मां तोड़ के पिया है
गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का उछल के छुआ है
छाया लिया भली धुप यहां है
नया-नया सा है रूप यहां
यहां सब कुछ है मां फिर भी
लगे बिन तेरे मुझको अकेला
आजा सांझ हुई मुझे तेरी फिकर धुंधला गयी देख मेरी नज़र आ जा ना
रंग दे बसंती हा राकेश ओमप्रकाश मेहराचा लँडमार्क चित्रपट.. सर्वांच्या भूमिका उत्तम. ह्यात कॅप्टन अजय राठोडंच पात्र निभावलय ते आर . माधवन ह्याने.. तो साहसी कॅप्टन असतो आणि तो त्याची सेवा बजावताना शहीद होतो.. सहाजिकच त्याच्या आईला आणि त्याच्या प्रेयसीला हा मोठा धक्का असतो . कॅप्टन अजय राठोडचं इवलंस भावविश्व ह्या गाण्यात दाखवलंय. वडिलांच्या निधनानंतर आईचं आणि त्याचं नात्याचे पदर ह्या गाण्याच्या शब्दांत पूर्णपणे उतरवलेत..तो त्याच्या आयुष्यात पुढे गेलेला असला तरी आईला त्याची काळजी असतेच हे ह्या गाण्याच्या दुसऱ्या कडव्यात एकदम सहजरित्या मांडलंय.. प्रसून जोशी सारख्या गितकाराचे शब्द आणि रेहमानसारख्या संगीतकाराचं संगीत म्हणजे बाप.. त्यात लतादीदींचा आवाज म्हणजे ऑन द टॉप नॉच. लोकांच्या हृदयात जाण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. माझ्या हृदयात ती जागा रहमान आणि लतादीदींसाठी राखीव आहे..
मी डोळे उघडले , माझ्या डोळ्यातुन पूर्णपणे अश्रू वाहत होते, तेव्हा ती आई आणि तो तिचा मुलगा तिथे नव्हते.होतो तिथे तर तो मी,समुद्र आणि सूर्य... मी आईला फोन केला,आईने फोन उचलल्या उचलल्या चौकशीचा भडिमार केला.. मी सगळ्या प्रश्नांची हसत हसत उत्तरे दिली.. आणि फोन ठेवला त्या मगाशीच्या मेसेजवर माझं मलाच हसू येत होतं. आयुष्यात कितीही संकटे आली तरी जोपर्यंत तुमची आई तुमच्याबरोबर आहे तोपर्यंत कुठलही संकट तुमचं काही बिघडवू शकत नाही हे मला कळलं होतं फरक एवढाच होता की त्या मुलाला ते वयाच्या 5/6 वर्षी समजलं होता आणि मला थोडं उशिरा !
आता सूर्य अस्ताला जात होता, रात्रीचा अंमल वातावरणावर जाणवू लागला होता.. हवेत थोडा गारवा जाणवू लागला होता.. कातरवेळ नुकतीच सुरू झाली होती.. अंधाराचे घट फुटू लागले होते. मीही गाडीत येऊन बसलो गाडी सुरू केली आणि निघालो.. आता सगळं कसं शांत झालं होतं. मोकळं आणि हलकं वाटत होतं. मन आणि विश्व सिद्ध झालं होतं ते उद्या उगवणाऱ्या सूर्याच्या झळाळीसाठी !!
© गौरीश देशपांडे
मला सतत फोन करणाऱ्या आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या , मनाने चिरतरुण राहणाऱ्या माझ्या आईस समर्पित..
टीप- हा प्रसंग घडलेला नसून अस्मादिक लेखकाची तेवढी कल्पनाशक्ती आहे.... मग वाचून काय करताय
हेडफोन्स अडकवा आणि आनंद लुटा या गाण्याचा..
हेडफोन्स अडकवा आणि आनंद लुटा या गाण्याचा..
खुप सुंदर..! Quality..!!
ReplyDeleteThank You SRL Creations 😂
DeleteThis comment has been removed by the author.
Delete