Saturday, 9 February 2019

केबीपी टॉक्स : एक प्रवास....

कॉलेजचं आयुष्य खूप रंग उधळत येतं,शांत,भडक,बटबटीत….
मी ही त्या रंगात स्वतःला न्हाऊन घेतलं,जमेल तेवढं ते पियुष पिऊन घेतलं.खरंतर मला कॉलेजमध्ये आल्यापासूनच मला काहीतरी असं करायचं होतं की जे यापूर्वी झालं नसेल.तसं तर मी कॉलेज मॅगझीन मध्ये थोडी फार ‘बोरूबाजी’ केलेली होती,पण ती काही समाधान देणारी नव्हती.अजून अपूर्णच वाटत होतं, चुकचुकल्यासारखं..

मग मी सेकंड इयरला आलो,मग खरा रंग यायला लागला.
सिनियर्सशी ओळखी झाल्या आणि त्यातच भेटला एक अवलिया साहिल नावाचा.ह्याची आणि माझी पहिली भेट एका वेगळ्याच कारणावरून झाली ते  निमित्त होतं युथ फेस्टिव्हलसाठी एकांकिका करण्याचं. भाईला भेटल्यावर मला पुढच्या 5 च मिनिटात मला समजलं होतं की ‘हा माणूस माझ्या आयुष्यात महत्वाचा आहे’ म्हणजे कसं असतं काही लोकांबरोबर आपली वेव्हलेंथ पटकन जुळते त्यातलाच हा एक. मग काय हळूहळू मी ह्यांच्यात रुळायला लागलो, मैफिली जमायला लागल्या.कट्यावर तासन्तास बसणं, नाटकं पहायला जाणं होऊ लागलं.काही कारणांमुळे आमची एकांकिका अर्धवटच राहिली.पुन्हा एकदा हुलकावणी बसली,काहीतरी नवीन करण्याच्या नादात आपण काही मूर्खपणा करत नाही ना असं सुद्धा एकदा-दोनदा वाटून गेलं.
असंच एकदा सप्टेंबर महिन्यात बसलो असताना साहिल म्हणला की आपलं टेडएक्सचं अँप्लिकेशन पुन्हा रिजेक्ट झालं.
मग आम्ही पुन्हा एकदा ते करायचं ठरवलं. पुन्हा केलं पुन्हा रिजेक्ट झालं.एव्हाना डिसेंबर संपला होता.
पुन्हा एकदा एकत्र बसलो, टीम बनवायची ठरली.विषय ठरले
मग पहिली मिटिंग घ्यायची ठरली…


आपली पहिली मिटिंग लायब्ररीत झाली.प्रत्येकांन थोडं थोडं लिहून आणायचं ठरवलं होतं. दरम्यानच्या काळात कॉलेजमध्ये असा काही प्रोग्रॅम घ्यावा का या विषयी मतमतांतरं सुरू होती. शेवटी प्रोग्रॅम घ्यायचं ठरलंच आणि त्यातून जन्माला आली एक अभिनव कल्पना ती म्हणजे ‘केबीपी टॉक्स’. विषय ठरवले, वक्ते ठरवले
अडचण होती ती फक्त निधी आणि कॉलेजची परवानगीची..
पण इथं आमच्या धडाडीचे कार्यकर्ते ‘धीरज आवडे व अनिकेत कर्णेनी’ बाजी मारली.भाऊंनी परवानगी काढली तरीसुद्धा निधीची भली मोठी अडचण आ वासून उभी होती आमची झोळी फाटकी होती.अशावेळी तिवारी सर आणि ‘ चहा आणि बरच काही’ या नव्यानेच सुरू झालेल्या हॉटेलचे मालक मदतीला धावून आले.
आर्थिक बाजू शिवम,धीरज यांनी एकदम उचलून धरली होती.
शिवमची मला आवडणारी गोष्ट म्हणजे ,तो लोकांना जबाबदारी एकदम देऊन टाकतो आणि ती पेलण्याचा आत्मविश्वास आणि मुख्य म्हणजे मोकळीक देतो.त्यानं मला स्क्रीप्टची जबाबदारी दिली, मला ती व्यवस्थित जमली का नाही ते लोकच सांगतील. तसंच वक्त्यांना द्यायची पुस्तकपण आणली.

बाकीच्या कॉलेजमध्ये कॅम्पेनिंग केलं,जोरदार प्रमोशन केलं.
पोस्टर बिस्टर लावले. हे सगळं स्पॉन्सरशिपवर चालू होतं.०
कार्यक्रमाला फक्त दोन दिवस राहिले होते.एंट्रीज पण जोरदार झाल्या होत्या.फोन करून कम्फर्मेशन चालू होतं.या मोक्याच्या वेळी मात्र कॉलेजने आम्हाला मदत करायची ठरवली.कॉलेजची मदत आल्यामुळं आमचा उत्साह सहाजिकच वाढला.जोरदार तयारी सुरू झाली.सगळे टीम मेम्बर्स ‘अथर्वा,अपूर्वा, वैष्णवी, मानसी,अभया,अरबाज,सौरभ,माधव,श्रीकांत  घरातलं कार्य असल्यासारखे काम करत होते. चुकलो हे आमच्या घरातीलच कार्य होतं आणि काहीही करून आम्हाला ते सिद्धीला न्यायचं होतं.

आदल्यादिवशी सकाळीच शिवमचा धमकीवजा फोन आला
गौऱ्या,आज काये ? म्हणलं लेक्चर्स आहेत.म्हणला ती नंतर कर.
आज तू पाहिजेस इथं. मग काय पडत्या फळाची आज्ञा समजून लागलो कामाला. ऑडीटोरियम रंगवण्यापासून सगळं केलं.
लाईट्स,खुर्च्या,गाण्यांची रिहर्सल सुरू केली. तेवढ्यात एक चहा कम कॉफी आली,त्यावर पुलंच्या शैलीत एक मस्तपैकी टोमणा मारला आणि निमूटपणे ती ‘चॉफी’ गळ्याखाली उतरवली..
गळ्याला शेक बसलेलाच होता,मग साहिलच्या गिटारवर रेडा रेकताना जसा आवाज येतो त्याहूनही बेकार सूर लावून मी माझा गळ्याचा व्यायाम पूर्ण करून घेतला. पुलं असते तर म्हणले असते,
“नरड्यात बाकी मजाय हा तुमच्या देशपांडे” असा एक विचार मनाला चाटून गेला.. 8 वाजत आले होते. तसही फेब्रुवारी महिना असूनही मला कसलीच घाई नव्हती, एकतर मी ‘ मेकॅनिकलचा विद्यार्थी’ आहे , दुसरं म्हणजे ‘ उपाशी मित्र मंडळाचा आजीव सभासद’ त्यामुळं मागे कसली लुडबुड नव्हती.त्यामुळं मनातल्या मनात ‘सिंगलेश्वर’ ह्या देवाचे आभार मानत मी राहिलेलं काम पूर्ण केलं..घरी जायला 9 वाजले..


मेसवर जाऊन पाहतो तर काय , ‘वांगं
’ ह्या मेसा पोरांना पिळण्यासाठीचं असतात.. (आपली M.E.S.A. नव्हे हं ) आधीच सकाळी ‘कोबी’ आता वांगं.निमूटपणे ते घशाखाली ढकललं.घरी फोन लावला..रूमवर आलो आणि झोपलो उठलो ते सकाळी 5.30 लाच.उठलो प्रश्न लिहून काढले, अंघोळ केली तोवर वाजले 7.30. मग तिथून पुढं काकांच्या स्टॉल वर जाऊन नाश्ता केला आणि 8.15 ला कॉलेजात पोहोचलो.
बेकार थंडी पडली होती. त्यातच रजिस्ट्रेशन आणि दिशादर्शक प्रिंट्स फ्रेंड्स मधून जाऊन काढून आणल्या.ह्या सगळ्या गोंधळात 9.15 वाजले..

एव्हाना आमचा तणाव वाढला होता.आम्ही पुन्हा फोन सुरू केले.
मुलं येणार होती पण वेळेबाबतीत ती एवढी सीरियस नव्हती.पण या आधी अश्या पद्धतीचा कार्यक्रम झालाच नसल्याने मुलं थोडी अनभिज्ञ होती.हळूहळू एक एक जण यायला लागले.बऱ्यापैकी हॉल भरला.आमच्या जीवात जीव यायला लागला.
सव्वादहाला भट सर आले.. सरांनी भाषण सुरू केलं.
गॅरी कास्परोव्ह पासून औटोमॅटिक व्हेईकल’ पर्यंत AI तंत्रज्ञानाच्या वापराने काय काय गोष्टी साध्य करता येऊ शकतात याचा पट त्यांनी सुंदररित्या उलगडून दाखवला.मग आदित्य यादव सरांचं एक एनर्जीटिक सेशन झालं.इथ थोडं आमचं टाईम मॅनेजमेंट गडबडलं.. पण आम्ही  सांभाळून घेतलं..

शेवटचं सेशन सर्वात महत्वाचं होतं. ते म्हणजे डॉक्टर भारत पाटणकर सरांचं.सरांचं मला कौतुक वाटलं कारण दिलेल्या विषयापासून ते अजिबात भरकटले नाहीत.राजकारणाविषयी त्यांनी बोलायचं कटाक्षाने टाळलं पण लोकशाहीची मात्र चांगलीच उहापोह केली.मला त्यांना प्रश्न विचारायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.खरतर त्यांची आई व आजी ह्या खास मैत्रिणी आणि दोघीही स्वातंत्र्यसैनिक.ही अशो एक वेगळीच नाळ त्यांच्याबरोबर जुळलेली आहे..
कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला.अजून कार्यक्रम पार पडला ह्यावर माझा विश्वासच बसत नाहीये.म्हणजे एवढी खपून तयारी केली आणि एवढ्यात कार्यक्रम झालापण..

खरतर लेखनाची जबाबदारी माझ्यावर असल्याने माझ्यातला एक मी मला म्हणत होता, ‘की तुला काय फार भाव मिळणार नाही’ पण त्या मनाच्या स्टेजच्या मी पलीकडे गेलो होतो कारण त्यातून मला जे समाधान मिळणार होतं ते सगळ्यात अनमोल असणार होतं.. मला माधवचं पण विशेष वाटतं, म्हणजे त्याचे माझे खटके उडतात पण ह्या इव्हेंटसाठी सगळ्यात जास्त जो राबला असेल तर तो म्हणजे माधव.. केबीपी टॉक्स आता बाल्यावस्थेत आहे आणि त्या बाळाला मोठं करायची जबाबदारी आम्हां सगळ्यांवर आहे.

अजून काहीतरी अपूर्णच वाटतंय,पण मनात कायम एक पोकळी असावी.रिकामी सतत रिकामी. जर अपूर्णता असेल तरच काहीतरी करायची जिद्द तयार होते.ह्या विश्वाचं सार जर कशात असेल तर ते अपूर्णतेत. माणसाला पूर्णता मिळाली की त्याचा देव होतो.पण तसली अर्थहीन पूर्णता काय कामाची..त्या देवालाही माणसाच्या  माणुसकीचा,भाव भावनांचा मोह पडत असावा आणि जर नसावा
तर , हे देवा बस माझ्यासमोर..तुला ‘केबीपी टॉक्स’ ऐकवतो आमच्याभावभावना ओतलेलं.


© गौरीश देशपांडे…. 😊

7 comments:

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...