आज भारताचे प्रथम शिक्षणमंत्री मौ.आझाद यांची पुण्यतिथी. हा माणूस कडवा परंपरावादी व तितकाच राष्ट्रवादी होता. त्यांना धर्म आणि राजकारण ह्यातली फारकत मुळीच मान्य नव्हती.कुराणाकडे चला हीच त्यांची मुख्य घोषणा होती.त्यांच्यावर मौ.शिब्लि यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.खरेतर आझाद पॅन इस्लामवादाच्या भावनेने प्रेरित झालेले होते व पहिल्या महायुद्धाच्या अंत काळात सुरू झालेल्या खिलाफत चळवळीचे कर्ते पुरुष होते.आझादांचे वडील खैरूद्दीन देहलवी हे प्रतिष्ठित मौलवी होते.1857 चा उठाव मोडल्यानंतर भारत हा 'दार उल हरब ' झाला आहे असे मानून ते हिजरत करून मक्केला गेले.तिथल्या मौलवींच्या सांगण्यानुसार त्यांनी भारतातील वहाबी विचारधारा सांगणारे 10 खंड लिहिले होते , ते इजिप्तमध्ये प्रसिद्ध झाले म्हणूनच ते इस्लामी जगात प्रसिद्धीस आले होते.अशा विद्वान पित्यापोटी 1888 मध्ये अबुल कलामांचा जन्म झाला. त्यांची आई अरब होती.आझाद म्हणजे स्वतंत्र. ( हे त्यांनी स्वतःला लावून घेतलेले टोपणनाव आहे). ते अशा कालखंडात वाढले आले होते की त्यावेळी सर्व इस्लामी जगतात पाश्चात्य सत्तेविषयी उद्रेक झालेला होता.ह्या सगळ्याचा तरुण आझादांवर खूप प्रभाव पडला.भारतात परत आल्यावर त्यांनी कोलकत्ता येथून अल-हिलाल नावाचे साप्ताहिक सुरू केले.आझाद ह्यांच्यावर पॅन इस्लामवादाचे अध्वर्यू मौ.जमालूद्दीन अल अफगाणी यांचा मोठा प्रभाव होता.अल हिलालमधल्या भावनेने भरलेल्या लेखनामुळे आझाद अल्पावधीत भारतात लोकप्रिय झाले.दोन वर्षात त्याच्या 26000 प्रति निघत होत्या यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येईल.त्यातील पॅन इस्लाम आणि ब्रिटिश विरोधी लेखांमुळे सरकारने त्यांच्यावर बंदी घातली.
मौ.आझाद पक्के परंपरावादी होते.स्वतः आझादांचा असा दावा होता की त्यांनी जिहाद हा शब्द मुस्लिमांच्या शब्दकोशात पुन्हा आणला.त्यांनीच अल हिलाल मध्ये लिहिले होते की मानवी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीकडे ते धार्मिक दृष्टीने पाहतात.आम्ही कुराणातून मार्गदर्शन घेत असतो.सर्व आवाजांसाठी आम्ही कान बंद केले आहेत.उर्वरित सर्व गोष्टींसाठी आम्ही डोळे बंद केले आहेत.प्रकाशाची गरज असेल तर तो आमच्या जवळ आहेच तो म्हणजे कुराण...
थोडक्यात पुन्हा कुराणाकडे चला असेच त्यांना म्हणायचे होते.1912 ते 1921 ह्या हिंदुमुस्लिम ऐक्याच्या काळात त्यांचे विचार हे पिकपॉइंटला होते.ह्याचा अर्थ नंतर ते बदलले असे नाही.1940 च्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर मला माझे पूर्वीचे विचार मान्य आहेत असेच त्यांनी म्हणले होते.
अनेक मौ. काँग्रेस सोडून लीग मध्ये गेले, काहींनी वेगळा पर्याय निवडला पण मौ. आझाद मात्र काँग्रेसमध्येच राहिले. राष्ट्रवादी मुसलमान म्हणून त्यांचे स्मरण नेहमीच होईल...
© गौरीश देशपांडे

थोडा सा विचार केला पाहिजे..चांगल लिहलय पन थोड critisie केल पाहिजे.सर्वच गोस्टी चुकिच्या नाहित तरिही...केलेल्या चांगल्या कामाच कौतुक हे जहालच पाहिजे.. गौरम्बो....
ReplyDeleteUnknown आहे
Deleteनाव कळू शकेल का तुमचे ?
म्हणजे मला रिप्लाय द्यायला सहजता येईल