वासोटा.....
सह्याद्रीच्या कुशीत( जरा जास्तच कुशीत 😅) वसलेले एक अनोखे दुर्गरत्न ...
खूप दिवसापासून मनी इच्छा होती की वासोटा पहायचा
मध्ये एकदा Deva Ghanekar दादा वासोट्यावर आले होते, खरं मला त्यांच्यासोबतच जायचे होते पण वेळेचं गणित न जमल्यामुळे तो प्रोग्राम फसला.
साधारणपणे आठवडाभरपूर्वी आमचे मित्र संतोष तुपे यांनी वासोट्यावर जायचा प्लॅन सांगितला, जायचं म्हणजे जायचंच या मताचा मी आणि रोहन होतो.
रविवारी सकाळी जायचं ठरलं, थ्रिल पाहिजे म्हणून दुचाकीवरून जायचं ठरलं ( खरं तर चारचाकी कुणाकडेही उपलब्ध नव्हती म्हणून थ्रिल असं लिहिलंय😂😂😂😂😂) मग रविवारी सकाळी मी आणि रोहन आणि रोहनचे दोन मित्र कृष्ण आणि सूर्यदेव
असे आम्ही एकूण चार जण बाईकवरून बामणोलीकडे निघालो . हाडं गोठवणारी थंडी होती, त्या कडाक्याच्या थंडीत आम्ही चाललो होतो, कास कास वरून बामणोली
पण अंधारात वाट चुकल्यामुळे आम्ही चुकून तेटली गावात पोहोचलो तिथल्या जलतारा रिसॉर्ट वर बसलो
पण समजले की ग्रुप चुकीचा आहे आपण चुकलोय
परत रेंज आली आणि मग फोन केला संतोषदादाना
मग ते म्हटले भैरवनाथ बोट क्लब पशी ये मग तिथून मग सुरू झाला थंडीचा मागे येण्याचा प्रवास मग परत मागे आलो आणि बोटक्लब मध्ये पोचलो , बामणोलीत चहा नाश्ता केला आणि बोटची वाट बघत बसलो
आम्ही पोचलो साडेसहा वाजता टेंटलीत होतो
उलटं मागे बामणोलीत जायला 8 वाजले.
8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत नुसता टाईमपास
कारण वनखाते आपले अतिशय सुंदर नियोजन करते ना
3 तास एकही बोट नव्हती, वाटलं वासोटा काय होत नाही आज , माग कासला जाऊ , बंधुप्रेमला जेवू आणि गप घरी जाऊ , कृष्णा तर जाम वैतागला होता.
शेवटी सव्वाअकरा वाजता बोटीत बसलो, बोटवाले काका म्हातारे होते,शेवटी तेच आमचे जॅक स्पॅरो पण, त्यांना म्हणलं काका टॉप गियर टाका ,पळवा रेटून!!!
काका काय टॉप गिअर टाकतच नव्हते
,शिवसागर जलाशयात फटाफट आवाज करीत एक एक
तरीपण दिड तास लागलाच
एकला वासोटा चढायला सुरुवात केली, सुरुवातील मज्जा वाटली, पण हळूहळू वसोट्यानी आमची परीक्षा घ्यायला सुरवात केली.
चढण लागलीत्यात पाठीवर जड वजनाची सॅक
तरी दीड तासात वासोटा चढलोच
गडावर चक्क फोनला रेंज आली, घरी फोन केला
जेवलो जर पडलो, फोटो काढले आणि मग उतरायला सुरुवात केली , दगडावर पाय ठेवत उतरायची जणू स्पर्धाच लागली. साडेपाच वाजता खाली आलो.
खाली आमचं यॉट आमची वाटच पाहता होतं,काय माहीत काकांनी काय खाल्लं होतं, अशी बोट पळवली
16 बोटींना माग टाकलं, साडेसहा वाजता
बामणोलीला आलो आणि आठ वाजता घरी पोहोचलो.
खरं तर सह्याद्री उत्तुंग,बेलाग , बुलंद आहे त्याचं आणखी एक रूप आज पाहायला मिळालं, खरं तर प्रत्येकानं
सह्याद्रीची ही रूपं पहिली पाहिजेत,आपली बंधन झुगारून देऊन सह्याद्रीच्या मैदानात बागडत सुटलं पाहिजे.सह्याद्री आपला पिता आहे , तो नक्कीच आपल्याल सामावून घेईल.........
गोरीश देशपांडे

No comments:
Post a Comment