Saturday, 17 February 2018

कोणत्याही मुलाला शोभेल इतपत छान उंची, लख्ख उजळ रंग, बारीकसे डोळे , तसा बऱ्यापैकी हसरा पण बराचसा धीरगंभीर चेहरा, टीशर्ट आणि शॉर्टस, अगदी टिपिकल स्विस ब्रुनेट, त्यातही ते छानसे सिल्की असलेले आणि कपाळावर रूळणारे केस आणि तो हेअरबँड. त्याचं दिसणं एखाद्या हिरोसारखं पण तरीही एकदम ऍथलेटिक शरीर. कुठल्याही हॉलिवूड पिक्चर मध्ये सहज चालून गेला असता फेडी अर्थात रॉजर फेडरर ...

टेनिसने असे सर्वोत्तम खेळाडू आपल्याला दिले त्यातलाच एक रॉजर फेडरर, वयाच्या 17 व्या वर्षीच पदार्पण त्यातच संप्रास, आगासी सारखे खेळाडू पण आपल्या ह्या पठ्याने त्याच्या शांत,  संयमी वेळप्रसंगी तितक्याच भेदक खेळाने सर्वांनाच आपलंसं केलं .......

दोन हजारच्या दशकात पिट संप्रास , आंद्रे अगासि हे खेळाडू टेनिस कोर्टवर अक्षरशः आग ओकत होते .त्यातच हा आपला नवखा कधी पाय उभारून घट्ट रोवून बसला हे कळलंच नाही. फेडी आणि मार्क  2003 च्या विम्बि  फायनलला पहिल्यांदीच एकमेकांसमोर आले. मार्क तसा नवखा खेळाडू नव्हता तो फेडी पेक्षा रँक नि वर होता पण नवख्या 22वर्षांच्या फेडीनं त्याला  विशेष संधी नं देता पहिल्यांदा तो कप पटकावला. विम्बल्डन च्या हिरवळीला नवा कारभारी मिळाला, पुढे 8 वेळा त्याने या कपवर आपलं नाव कोरलं, 2004,05,06,07 हि वर्षे तर फेडीच्या आयुष्यतली सर्वात यशस्वी वर्ष  ...

फेडीची आठवण झाल्यावर नदालला तरी कसे विसरू आपण ,  संपूर्ण टेनिसवर फेडररचा एकछत्री अंमल आहे असं वाटतं असतानाच राफाचा उदय झाला. नवख्या राफाचा क्ले कोर्टवर चांगलाच जम बसलेला
दोघांमध्ये एकूण 37 सामने झाले त्यापैकी ग्रास आणि हार्ड कोर्टवरचे सामने फेडरर ने एकहाती खेचले पण क्ले कोर्ट वर त्याला नदाल ला हरवणं जमलं नाही
फेडररची खेळायची क्षमता उत्तुंग होती अगदी पाच पाच सेट्स पर्यंत सामना ताणवायचा आणि ऑपॉनंट ला दमवून मारायचा आणि मोक्याच्या वेळी खेळ इतका उंचवायचा की त्या लाटेत सगळं उध्वस्त व्हायचं. त्याचा धडाकाच असा होता.की त्याच 2006 ते 2008 च्या प्रत्येक विम्बि आणि फ्रेंच फायनल ला फेडी आणि नदाल हे अगदी ठरलेलं गणित , यापैकी चार सामने अगदी 5 सेट्स पर्यंत झाले , 2008 ची विम्बि फायनल मला नाही वाटत कि मी ती विसरेन, नदाल जिंकला ती फायनल
पण पुढच्याच वर्षी फेडीनं आपलं फ्रेंच ओपन च पहिलंवहिलं विजेतेपद पटकावलं ते पण नदाल ला हरवून
हे त्याचं पाहिलं आणि शेवटचं फेंच ओपन विजेतेपद ..
मैदानावरचा शांत, संयमी आणि ग्रेसफुल वावर हे त्याचं बलस्थान होतंच पण जबरदस्त फोरहँड हे त्याचं खरं हुकमी अस्त्र. अफलातून पदलालित्याच्या जोरावर तो फोरहँडसाठी बरोबर जागा करून घ्यायचा. जोडीला बॅकहँड स्लाईस तर होताच. ह्या फ्लॅट आणि स्पिन होणाऱ्या स्लाईसने समोरचा खेळाडू अगदी बेजार होऊन जायचा.अगदी परिपूर्ण खेळ. बघा ना, आठ विंबल्डन, एकच  फ्रेंचओपन, पाच यूएसओपन आणि सहा ऑस्ट्रेलियन ओपन..यंदाचं विम्बल्डन जिंकून फेडरर नी भीष्मपराक्रमच केला. खरं तर 2012 पासून त्याला विम्बल्डननी हुलकावणी दिली होती, यंदाच्या स्पर्धेत मात्र त्याने  "भूतो न भविष्यति" खेळ करत आता फेडरर संपला म्हणणारया सर्वाना चोख प्रत्युत्तर दिलं. अंतिम सामन्यात त्याने मारिन चिलिच चा पराभव करुन आपल्यातील टेनिस अजूनही जसच्या तस असल्याची जाणीव संपूर्ण टेनिसजगताला करून दिली .
फेडी आणि नदाल जोडीनं 2005 ते 2009 पर्यंत पहिली दोन स्थानं काबीज केलेली , फेडीनं तर 237 आठवडे आणि एकूण मिळून 302 आठवडे पाहिलं स्थान सोडलं नाही..
सामाजिक जाणिवेतून त्याने रॉजर फेडरर फौंडेशन ची सुद्धा स्थापना केली आहे . त्या अंतर्गत तो समाजातील विषमता कमी करायचा प्रयत्न करतोय, एक सामान्य घरातुन आलेला मुलगा  मनात आणलं तर काय करु शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे रॉजर फेडरर ......
भारतात  उत्तम टेनिसपटु का तयार होत नाहीत
हा त्याला विचारलेला एक प्रश्न
तो म्हणतो कि,' भारतात टैलेंट खुप आहे पण खेलाकडे करियर म्हणून फार कमी लोक पाहतात' ...
त्याचं बोलण खरच आहे म्हणा .
समजून चला रॉजर जर पुण्यातील सदाशिव पेठेत जन्मला असता तर काय झाल असतं
राॅजर सदाशिवी रहात असता, तर त्याच्या बालपणी,  साधारणत: अशी काही वाक्ये कानी आली असती.
1. सकाळपासून रात्रीपर्यंत तो झारा घेऊन खेळत बसायचं.
2. अभ्यासाचं नाव नाही.
3. आमचा दिगू असा उंडारला असता, तर त्याच ब्याटीनी फोडला असता.
4. पण आईचं तरी लक्ष नको का ?
5. यांना काय कपांची दुकानं काढायची आहेत का ?
6. खेळून पोटं भरत नाहीत म्हणावं !
7. Maths राहिलाय म्हणे  सहामाहीचा.
8. काकू, तुमच्या राॅजरनी आमचा बाॅल हरवला.
9. खेळतो बरा पण पुढे टिकलं पाहिजे. नाहीतर आमच्या बेबी सारखं व्हायचं.
10. ते तुझं टेनिस गेलं उडत.  क्रिकेटची मॅच घेतो का राॅजर  भावड्या 
ही वृत्ति आपण सोडून दिली पाहिजे
तर भारतात टेनिस चांगल रुजेल हे माझ व्यक्तिगत मत आहे ...
त्याने 'फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट" ही इंग्रजी मधील उक्ति सार्थ ठरवली .अगदी परवा झालेली ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तो ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरला. काही व्यक्तिमत्वे 'लार्जर दॅन लाईफ' असतात ,फेडी त्याचं मूर्तिमंत उदाहरण. गेल्या पाच-सहा वर्षात त्याला कारकिर्दीतल्या चढउताराला सामोरं जावं लागलं, दरम्यानच्या काळात अनेक खेळाडूंनी त्याला हरवलं, त्याचं नंबर वन रँकिंग गेलं,पण तो खचला नाही, खेळतच राहिला; दोन तीन वर्षे अशीच गेली त्या काळात जोकवीच, मरे, नदाल असे नंबर वन खिताबाचे अनेक मानकरी झाले.हा पटठ्या मात्र नंबर तीनवर कॉन्स्टंट राहिला, दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून फेडररने 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा भीमपराक्रम केला. त्याबरोबरच त्यानं मिळवलं त्याचं नंबर वन रँकिंग.फेडी पुन्हा राजा झाला. 36 वर्षाचा असताना नंबर वन राहणं ते पण टेनिस सारख्या इंडिव्हिज्युअल खेळात ही नक्कीच खायची गोष्ट नाही.  मध्यंतरी त्याचा फॉर्म ढासळला , "किती खेळतोय हा
फेडरर आता निवृत्त हो , काही नाही हो विक्रम करायला एक ग्रैंडस्लम कमी पडतय म्हणून खेळतोय."
  म्हणून टीकाही झाली पण यन्दाच विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून त्यानं टीकाकारांची तोंडे बंद केली.
 सचिन नाही का चाळीशी पर्यंत खेळला. जोपर्यँत त्याला जमतंय तोपर्यंत तो खेळणारच ,   अगदी टेनिसच उदाहरण द्यायच झालं आपला पेस देखील चाळीशीत खेळतोय मग फेडी तर आता कुठे 36 वर्षाचा आहे. , आजवर तो जसा संयमी खेळला तसच त्याने खेळाव हीच इच्छा आणि भावी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा .....
©गौरीश देशपांडे

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...