Saturday, 13 April 2019

एक दिवस एक गाणं ..



आयुष्यातला काही काळ आपण गोष्टी मिळवण्यासाठी देत असतो. सुरुवातीला शिक्षण नंतर नोकरी/बिजनेस,मग लग्न वगैरे..म्हणजे स्वतःच्या आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा आपला प्रयत्न असतो. अशी शांत आणि छान लाईफ सर्वानाच हवीहवीशी असते,सगळीच माणसं विविध मार्गांनी अश्या आयुष्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि मग शेवटी ते त्यात यशस्वी होतात.स्वतःच मोठ्ठ घर,हाताशी चांगला पैसा, प्रेमळ आईवडील,सुंदर अशी पत्नी, गोड मुलं असा प्रपंच व्यवस्थित सुरू असतो..सुखी आयुष्याची प्रत्येकाची कन्सेप्ट वेगवेगळी असली तर बहुतेक लोकांची ही अशीच असते..Life At Peace अशी संज्ञा त्याला आहे. मग अचानक आयुष्यात एक वादळ येतं आणि त्याने लाईफला एक वेगळंच वळण येतं. आपण असं अनेकांना म्हणताना ऐकलं असेल की ‘ती एक चूक मला फार महाग पडली’ किंवा ‘ते जर मी केलं नसतं तर आज हे असं झालं नसतं.’ मुळात ‘करू नये ते केले की होऊ नये ते होते.’ पण ह्या चुका सुधारायची संधी मात्र काहींना मिळते तर काहींना नाही..

मी बोलतोय ‘मासुम’ चित्रपटाबद्दल.मासुम हा गुलजार साहेबांचा लँडमार्क चित्रपट आणि शेखर कपूर ह्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा.मासुमंच आणि माझं एक वेगळंच नातं आहे.जेव्हा केव्हा मी ट्रान्समध्ये जातो तेव्हा मासुम पाहतोच पाहतो.अतिशय तरल विषयावर हा सिनेमा बेतलेला आहे.
नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमी हे एकमेकांचे नवरा बायको..गोड दोन मुली असा कुणाची दृष्ट न लागावी असा संसार..
सगळं मस्त चाललेलं असतं;पण एक दिवस नसिरुद्दीनला एक पत्र येतं आणि त्याचं सगळं आयुष्यच बदलून जातं. त्या पत्राद्वारे त्याला समजतं की पूर्वायुष्यातील काही चुकांमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर त्याची किंमत चुकवावी लागणार आहे..आणि मग पडद्यावर एन्ट्री होते ती जुगल हंसराजची..जुगल हंसराजने मोठं होऊन जरी काही छाप मारली नसली तरी ह्या सिनेमात तो अतिशय भाव खाऊन गेलाय.विशेष म्हणजे त्याचे ते पाणीदार आणि बोलके डोळे.हा जुगल म्हणजेच पिक्चरमधलं नाव ( राहुल)
हा नसिरुद्दीन शाहचा मुलगा असतो पण तो असतो सुप्रिया पाठककडून.पुढे सुप्रिया पाठक मरते मग राहुल नसिरुद्दीन शाह कडे राहायला येतो.मग शबाना आझमीचं त्याला सावत्र म्हणून हिणवणं. विंकी आणि मिनी ह्या दोन बहिणीबरोबर राहुलचं मिसळून जाणं पडद्यावर सुंदररित्या चितारलयं.

मासुमची गाणी हा तर स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.
‘लकडी की काठी’ हे गाणं तर प्रत्येक बालगोपाळाच्या तोंडावर अजून असतं.‘हुजूर इस कदर भी ना इतराके चलीये’ ही गझल म्हणजे सर्व पुरुषांनी पहावी अशी गझल आहे.’तुझसे नाराज नही जिंदगी’ ह्या गाण्याला लताबाईंनी त्यांच्या आवाजाने चार चांद लावले आहेत;पण मी बोलणार आहे ते ‘ दो नैना और एक कहानी’ ह्या आरती मुखर्जीच्या गाण्याबद्दल.

दो नैना और एक कहानी
दो नैना और एक कहानी
थोड़ा-सा बादल
थोड़ा-सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी
थोड़ा-सा बादल
थोड़ा-सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी
छोटी सी दो, झीलों में वो
बहती रहती है
छोटी सी दो, झीलों में वो
बहती रहती है
कोई सुने या ना सुने
कहती रहती है
कुछ लिख के और कुछ ज़ुबानी
थोड़ा सा बादल
थोड़ा-सा पानी
और एक कहानी
दो नैना और एक कहानी
थोड़ी सी है जानी हुई
थोड़ी सी नयी
थोड़ी सी है जानी हुई
थोड़ी सी नयी
जहाँ रुके आँसू वहीं
पूरी हो गयी
है तो नयी फिर भी है पुरानी
थोड़ा सा बादल
थोड़ा-सा पानी
और…

हे गाणं म्हणजे शबाना आणि राहुल ह्या दोघांच्या भावविश्वाचं साधं सरळ चित्र आहे..आपला नवरा कुण्या दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो, एवढंच नव्हे तर तिच्यापासून त्याला एक मुलगाही (राहुल) आहे.हे शबानाला खटकत असतं. तिच्या आयुष्यात उगाच कुणी लुडबुड केलेली तिला चालणारी नसती.आपण आपल्या नवऱ्यावर प्रेम करायला कुठं कमी पडलो का ? की त्याला आपल्यात इंटरेस्टच नाही अशी भावना तिला डाचत राहते..हे ह्या गाण्यात चांगलं मांडलंय..सोबतीला राहुलचं निरागसपण, ही आई आपल्याला का सामावून घेत नाही आहे,त्यांच्या फॅमिलीत त्याचं स्वतःच अस्तित्व शोधायचा केविलवाणा प्रयत्न.ह्या गाण्यात तो प्रत्येक ठिकाणी त्याच्या आईला शबानाच्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय.त्याच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा आपले डोळेही ओले झाल्याशिवाय राहत नाहीत..
त्यामुळं मासुम हा सर्वार्थाने एक चित्रपट म्हणून चांगला आहे.RD बर्मनचं संगीत आणि शेखर कपूरची संगीताची जाण ह्यामुळे ह्यातली गाणी अजरामर बनली आहेत..
मला लताबाई जरी प्रचंड आवडत असल्या तरी गेले काही दिवस मी अडकलो आहे ते ह्या आरती मुखर्जीच्या गाण्यामध्ये…

गाण्याची लिंक
https://youtu.be/T1NtFQHEZhQ

©गौरीश देशपांडे

No comments:

Post a Comment

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...