Wednesday, 14 February 2018

व्हॅलेंटाईन डे स्पेशल कविता.....

सुर्यास्ती अंत होताना ,
कातरवेळी मनात विचारांचं
वादळ सुरू असताना,
त्या बाहेरच्या रातराणीच्या सुगंधानं तुला माझी आठवण येईल.....

काळ्या ढगांनी पूर्ण आभाळ दाटुन आलेलं असताना,
पावसाचे थेंब मनात टपकत असताना ,
गन्धभरल्या त्या मृदगंधानं तुला माझी आठवण येईल ........

आसमंत सुखात न्हाऊन निघालं असताना
तुझ्या आर्त श्वासांनी नितळ काचेला घट्ट मिठी मारली असताना
अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळूकेनं ,
तुला माझी आठवण येईल.........

मस्त गुलाबी थंडीत
शुभ्र धुक्यात शहर हरवलं असताना,
चाफ्याचं फुल तुझ्या केसात माळताना,
समोरचा बहरलेला 'परिजातक'
पाहून ,
तुला माझी आठवण येईल ......
😃😃
© गौरीश देशपांडे

2 comments:

The Dark Side of Pottor

Professor Hermione Grainger drank her way through the train ride to Hogwarts; when she finally slept, she dreamed of the day Harry died, a...